सोशल मीडियावर 65 मुलींशी मैत्री करणार्या व्यक्तीला अटक
कानपूर (उत्तर प्रदेश),
कानपूर क्राइम ब-ँच पोलिसांनी ईल व्हिडीओ बनवून मुलींना ब्लॅकमेल करणार्या एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल फोनमधून जवळपास 65 मुलींचे ईल व्हिडीओ मिळविले आहेत.
पीडितांपैकी एकीने 7 ऑगस्टला कल्याणपूर पोलिस स्टेशनमध्ये प्राथमिकी नोंदविल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.
डीसीपी (गुन्हे) सलमान ताज पाटिलनी सांगितले की तक्रारकर्त्यांनी आरोप केला होता की अंकुर उमर नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली, तिच्या बरोबर शारिरीक संबंध ठेवले आणि नंतर ईल व्हिडीओ चित्रीत केला. तिने आरोप केला की तो आता तिला ब्लॅकमेल करत आहे. तिच्या कुंटुंबातील सदस्यांनाही या सर्वां बाबत माहिती पडले आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख शाहजहाँपूर निवासी 28 वर्षीय शेखर सुमनच्या रुपात झाली आहे. गुन्हे शाखेने ज्यावेळी त्याचा मोबाईल आणि फेसबुक अकाउंटला क्रॉस चेक केले तर ते आश्चर्यचकित राहिले.
पोलिस अधिकार्याने सांगितले की त्याच्या मोबाईल फोनमधून मुलींचे जवळपास 65 ईल व्हिडीओ मिळविले आहेत. याच बरोबर शेकडो मुलीं बरोबरील चॅटिंगचा तपशिल आणि त्यांचे संपर्क क्रमांकही मिळले.
शेखर फेसबुक व इंस्टाग-ामवर बनावट आयडीच्या माध्यमातून मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता. तो याना मैत्रीच्या नात्यात फसवत होता आणि नंतर ईल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत होता.
डीसीपीनी म्हटले की शेखर सुमन रोज 150 ते 200 मुलीं बरोबर चॅट करत होता. त्याने फेसबुकवर अंकुर गुप्ता, आयुष अग-वाल, अंकुर उमर, नेहा अग-वाल, सौम्या उमर आदींच्या नावाने बनावट आयडी बनवले आहे. अंकुर उमर यावरच त्यांचा फक्त खरा फोटो आहे तर बाकीमध्ये मुलींंचे काढलेल्या फोटोंचा वापर करण्यात आला आहे. अंकुर शेखर हे त्याचे टोपण नाव आहे. या तपासामध्ये माहिती पडले की शेखर आग-ा, शाहजहाँपूर, लखनऊ, बरेली, मुरादाबाद, प्रयागराज बरोबरच दिल्ली, मुंबई, झारखंड आणि उत्तराखंडमधील मुलींच्या संपर्कात होता.
शेकडो मुलींना फसविणार्या शेखरने शाहजहाँपूरमधील एका पोस्ट ग-ॅज्युएट संस्कृत कॉलजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते.