अर्थमंत्री राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषेच्या पुस्तिकेचे उद्या करणार प्रकाशन
मुंबई,
भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन, उद्या नवी दिल्ली येथे राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करणार आहेत.
राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषेच्या या पुस्तिकेत (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन, र्श्झ्) केंद्र सरकारच्या ब-ाउनफिल्ड पायाभूत सुविधांच्या मालमत्तांची चार वर्षांची रुपरेषा समाविष्ट आहे. गुंतवणूकदारांसाठी दृश्यमानता प्रदान करण्याव्यतिरिक्त, एनएमपी हे सरकारच्या मालमत्ता चलनीकरण उपक्रमासाठी मध्यम मुदतीची रुपरेषा म्हणून देखील कार्य करेल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 ने पायाभूत सुविधांसाठी नाविन्यपूर्ण आणि पर्यायी अर्थसहाय्य वाढवण्याचे साधन म्हणून मालमत्ता कमाईवर भर दिला आणि त्यात अनेक प्रमुख घोषणा समाविष्ट केल्या होत्या.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार, प्रमुख कार्यकारी अधिकारी, श्री अमिताभ कांत आणि ज्यांच्या मालमत्तांच्या चलनीकरणाच्या कामाचा समावेश आहे अशा संबंधित मंत्रालयाच्या सचिवांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चलनीकरण रूपरेषेच्या या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाईल.