लॉ. अतुल लढ्ढा यांना सर्वोत्कृष्ट प्रकल्प समन्वयक व जी. एस. टी. चे प्रथम मानांकन।

जालना,

चौदा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लॉयन्स क्लबच्या थ-ी. टू .थ-ी.फोर.एच .टू.

प्रांताचे प्रकल्प समन्वयक एम. जे. एफ. लॉ. अतुल लढ्ढा यांना सर्वोत्कृष्ट प्रकल्प समन्वयक तसेच योग्य समन्वय ठेवल्याबद्दल सन 2020 -21 वर्षातील बेस्ट डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन च्या प्रथम मानांकनाने गौरविण्यात आले आहे.

औरंगाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ लॉयन्स सदस्य लॉ. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन लॉ. अतुल लढ्ढा यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी लॉयन्सचे आंतरराष्ट्रीय संचालक लॉ.नवल मालू, बहु प्रांतीय प्रांतपाल लॉ. विवेक अभ्यंकर, प्रांतपाल लॉ.दिलीप मोदी, प्रथम उपप्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया, प्रांतीय सचिव लॉ.दत्तात्रय औसेकर, प्रांतीय कोषाध्यक्ष लॉ. मोरेश्वर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नंदुरबार ,धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड ,परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या प्रांताचे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहताना लॉ. अतुल लढ्ढा यांनी

लॉयन्स चे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मधुमेह, मोतिया बिंदू, गरजवंतांना भोजन, पर्यावरण ,कॅन्सरग्रस्त बालकांवरील शस्त्रक्रिया या पाच प्रकल्पां सोबतच प्रांतीय स्तरावरील कृषी, राष्ट्र ,गुरु ,नेत्र, युवा ,अन्न, कॅन्सर पासून मुक्ती, महिला ,जल, श्रमिक व योग अशा सर्व क्षेत्रात प्रांतात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्षभरात राबविलेल्या प्रकल्पांत योग्य समन्वय साधला.

लॉ.अतुल लढ्ढा यांनी सांगितले की, सन 2020-21 या वर्षात कोवीड संसर्गाचा प्रादुर्भाव असतांना ही मधुमेह 569,पर्यावरण 286,कॅन्सरग्रस्त बालकांबाबत 357,गरजवंतांना भोजनदान 9,493,नेत्रसेवा 2,192,या व्यतिरिक्त 6,334 असे एकूण 19,231 प्रकल्प यशस्वीपणे राबविले असून त्याचा 53 लाख 22 हजार 358 नागरिकांना लाभ मिळाला आहे.असे सांगून लॉ. अतुल लढ्ढा यांनी कठीण काळात लॉयन्स पदाधिकारी व सदस्यांनी सेवेचा वारसा जपला असून आपण प्रकल्पांमध्ये राखलेल्या समन्वयाची प्रा.तांने दखल घेतली. दरम्यान विशेष पुरस्कार व बेस्ट चेअरपर्सन चा प्रथम पुरस्कार अशा दोन्ही पुरस्कारांची मानांकने मिळाल्या बद्दल लॉ. अतुल लढ्ढा यांचे जालना लॉयन्स परिवाराने अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!