मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर हातोडा, किरीट सोमय्या म्हणाले, करून दाखवलं!
दापोली,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेला बंगला तोडण्यात आला आहे. मुरुड समुद्रकिनारी र्ण्ीैंं नियमांचं उल्लंघन करुन हा बंगला बांधल्यानं ही कारवाई केली गेली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याबाबत पर्यावरण खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन बंगल्याचं पाडकाम करण्यात आलं.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी मिलिंद नार्वेकर यांचा अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळीच केलं गेलं. किरीट सोमय्या या कारवाईचा व्हिडीओ टिवट करून माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत. सोमय्या यांनी टवीट करत म्हटलं आहे की, आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या मुरुड गावाच्या समुद्र किनार्यावर बेकायदेशीर प्रशस्त बंगला बांधायला सुरुवात केली आहे. असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांचे बेकायदेशीर बंगले आहेत, त्यामुळे शिवसेना म्हणजे ’बेकायदेशीर बंगलो’ सेना आहे अशी टीकाही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसात होणार आहे असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. याच समुद्रावर अनिल परब यांच्या पासून काही फूटाच्या अंतरावर मिलिंद नार्वेकर यांनी 72 गुंठा जागा खरेदी केली. त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उत्खनन ही सुरु आहे. या संबंधी महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण सचिव व महाराष्ट्र तटीय नियमन क्षेत्र (उठन) च्या अध्यक्षा श्रीमती मनिषा म्हैसकर यांना भेटून तक्रार केली आहे असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. या आधी समोरचा मुरुड (अलिबाग) येथे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावावर अशाच प्रकारचे बेकायदेशीररित्या 19 बंगले विकत घेतले आहेत असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला होता.