ज्वेलर्स भरत जैन हत्या प्रकरणाचा उलगडा? पोलिसांनी दोघांना केली अटक

ठाणे,

ठाण्यातील चरई परिसरात राहणारे ज्वेलर्स भरत जैन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब-ा रेतिबंदर येथील खाडीत सापडला होता. 15 ऑॅगस्ट रोजी जैन यांची पत्नी सीमा जैन यांनी नौपाडा पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता ठाणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कल्याण परिसरातून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी दोन आरोपींना कल्याणमधून अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा उलगडा केला असल्याचा दावा केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाच्या घरातून जैन यांच्या दुकानातून चोरलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

या हत्या प्रकरणात आणखी दोन जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र सोने दागिन्यांच्या दुकानात फक्त चांदीच चोरांनी चोरली ? असा प्रश्न भरत जैन यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

14 ऑॅगस्ट रोजी पत्नीला व्हॉटसअपवर भरत जैन यांनी फोन केला होता, त्यानंतर फोन बंद झाला. मात्र असे देखील समोर आले आहे की, 14 ऑॅगस्टच्या रात्री जैन यांच्या ज्वेलरी दुकानात चोरी झाली होती त्यानंतर त्या ठिकाच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांनी ओला ड्राईव्हला ताब्यात घेतले होते. तसेच जैन यांचे हात पाय बांधून तोंडात रुमाल कोंबून ही हत्या करण्यात आलेली आहे असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!