जालना जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्रकार दिन साजरा
जालना,
संवेदनशील छायाचित्रकार असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारांचे नेते असून त्यांचच ते ऐकतात . अडचणीत आलेल्या छायाचित्रकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्यार्ंकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी दिली.
जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त गुरूवारी ( ता .19) जालना जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे आयोजित सोहळ्यात उद्धाटक म्हणून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर हे बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर , सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर श्री कृष्णा पाटील, मॉडेल अमृता गौतम ,उद्योजक सुभाषचंद्र देवीदान,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे,जयप्रकाश चव्हाण, नगरसेवक विष्णू पाचफुले, संध्याताई देठे असोसिएशन चे अध्यक्ष अनिल व्यवहारे , उपाध्यक्ष सोनाजी नन्नवरे, महोत्सव समितीचे अध्यक्ष श्याम गिराम ,सचिव प्रभाकर शिंदे , उपाध्यक्ष किशोर कारगुडे ,कोषाध्यक्ष किशन तावरे, आशीष रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना, टाळेबंदी मुळे
छायाचित्रकार अडचणीत सापडले असून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्या मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी फोटोग्राफर्स असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष अनिल व्यवहारे यांनी प्रास्ताविकात केली होती. तोच धागा पकडून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले, छायाचित्रकारांची नेते असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असून ते छायाचित्रकारांच ऐकतात. असे सांगून आपण मंगळवारी मुख्यमंत्यार्ंना भेटणार असून तुमच्या व्यथा मांडणार असल्याची ग्वाही अर्जुनराव खोतकर यांनी दिली.
मोबाईल मुळे प्रत्येक जण छायाचित्रकार झाला असून तुमची संघटना आता जगात क्रमांक एक ची झाली असल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी नमूद केले.
सिनेमॅटोग्राफर श्रीकृष्णा पाटील यांनी दृक-श्राव्य साधनांच्या माध्यमातून उपस्थित छायाचित्रकारांना टाळेबंदी काळात नाविन्यपूर्ण कलात्मकतेचा शोध घेऊन केलेल्या कलाकृती विषयी सखोल माहिती दिली. तसेच आव्हान असले तरी कौशल्य विकसित करून आपला व्यवसाय नेटाने पुढे न्यावा असे श्री कृष्णा पाटील यांनी सांगितले.
मॉडेल अमृता गौतम यांनी कॅमेरा व व्हिडीओ ग्राफर शिवशिवाय मानवी जीवन अपूर्ण असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविकात फोटोग्राफर असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष अनिल व्यवहारे यांनी कोरोना, टाळेबंदी च्या संकटामुळे छायाचित्रकार हिरमुसले असून विवाह सोहळ्यावर मर्यादा आली तर शासकीय समारंभ, राजकीय सभा बंद असल्याने फोटोग्राफी व्यवसाय अडचणीतून जात असून छायाचित्रकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा .अशी मागणी अनिल व्यवहारे यांनी केली. ज्ञानेश्वर गिराम यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले तर महोत्सव समितीचे अध्यक्ष श्याम गिराम यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संजय देठे, अतुल व्यवहारे राजेश खर्डेकर लक्ष्मीकांत नारळे नरसिंग सरगम राजेश कंठाळे, आर के समद ,जका कादरी, गौतम वाघमारे, शेख इक्बाल, जावेद तांबोळी, मकसूद नाज, अनिल लोखंडे, प्रशांत जिगे, अभी राठोड, विशाल यादव, प्रवीण जैन, दिलीप खडसे, नमोकार हिरप, अशोक आवटी, सिताराम मुजमुले, चक्रधर बळप , अभिषेक व्यवहारे, भोजराज मेरुकर, ओंकार व्यवहारे, शुभम भवर, अभिजीत ठाकूर, शेख शकील, भरत मोहिते नंदकिशोर शहाणे, गौरव बुट्टे, विष्णू जाधव, ज्ञानेश्वर मुळक, विष्णू नेवरे, महादेव जगदाळे,शेलार गिराम, अशोक मुळे ,एकनाथ गिराम, रवी गिराम ,रवी धांडे ,अर्जुन कंक, शरद खरात विशाल पुसे , ,श्याम सकुंडे, नंदकिशोर डंबाळे, समी कादरी, तरबेज कादरी, सिध्दू शेळके, खुशाल गायकवाड
यांच्या सह छायाचिञकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मानवाचे अस्तित्व टिपण्याची कला छायाचित्रकारांत : भास्करराव अंबेकर
जन्म ते मृत्यू पयर्ंत मानवी जीवन संग्रहित ठेवण्याचं काम छायाचित्रकार करत असून मानवाचे अस्तित्व टिपण्याची कला छायाचित्रकारांमध्ये असल्याची भावना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी व्यक्त केला.
जन्म ते मृत्यू पयर्ंत मानवी जीवनाचा प्रवास संग्रहित ठेवण्याचे कार्य छायाचित्रकारांकडून केले जात असून काळानुरूप झालेले बदल छायाचित्रकारांनी स्वीकारले आहेत .असे सांगून अंबेकर म्हणाले, तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत हजार शब्द ,अग्रलेख यांची भावना एका छायाचित्रातून व्यक्त होते. आनंद, उत्साह, संवेदना यासोबतच शोषित ,उपेक्षितांचे चेहरे छायाचित्रकार समाजासमोर आणत असतात .माणसाला निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी तसेच माणसाचं अस्तित्व टिपता येण्याची कला असलेल्या छायाचित्रकारांचे योगदान अमूल्य असल्याचे गौरवोद्गार भास्करराव अंबेकर यांनी काढले.