गोर सेनेच्या साखळी उपोषणाची आज सांगता ।
जालना,
स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदोन्नतीमधील रद्द झालेले आरक्षण पुर्ववत करावे, ओबीसींची जातिनिहाय जनगणना, तांडा वस्ती सुधार योजना, रखडलेली प्राध्यापक भरती या व अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार पासून जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून
तिसर्या दिवशी गुरूवारी ( ता. 19) गुरूवारी अंबड व घनसावंगी भरपावसात गोर सैनिक ठाण मांडून बसले आहेत.
ओबीसी घटकांवरील अन्याय दुर करावा
या साठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता
गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण,प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या आदेशानुसार
जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने गत आठवड्यात जिल्हाधिकार्यांना लेखी निवेदनाद्वारे साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी साखळी उपोषणात परतूर व मंठा तालुक्यातील पदाधिकारी व गोर सैनिकांनी सहभाग नोंदवला .तर आज बुधवारी जालना आणि जाफ्राबाद तालुक्यातील गोर सैनिक सहभागी झाले.यात जिल्हा
सहसचिव पंकज राठोड,जालना तालुका ध्यक्ष रितेश पवार, जाफ्राबाद तालुकाध्यक्ष अनिल पवार, अजय राठोड, अमोल चव्हाण, निरंजन चव्हाण, किरण राठोड, नेहरू आढे, राजू चव्हाण, एकनाथ राठोड, विनोद चव्हाण, शरद पवार, लखन राठोड, ज्ञानेश्वर राठोड,यांच्या सह पदाधिकारी व गोर सहभाग नोंदवला.
दरम्यान गुरूवारी अंबड व घनसावंगी तर शुक्रवारी बदनापुर व भोकरदन तालुक्यातील गोर सैनिक सहभागी होणार असून साखळी उपोषणाची सांगता होईल. असे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले.