नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नांदेड,

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी कार्यकर्त्यांसह अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या जवळील पेट्रोलचा कॅन जप्त केला आणि त्यांना अटक केली.

छावा संघटनेची ठोक मोर्चाची भूमिका –

’एकच मिशन मराठा आरक्षण’ अश्या घोषणा देत अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्तांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो प्रयत्न उलथून लावून छावाच्या कार्यकर्त्यांना अटक करून वजीराबाद पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, उद्या (शुक्रवार) खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्येच मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी मूक मोर्चा आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर छावाने मात्र ठोक मोर्च्याच्या भूमिकेचा आग-ह धरत आजचे (गुरूवार) आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी आता मूक आंदोलनाला काही अर्थ नाही, अशी भूमिका असल्याचे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी सांगितले. यावेळी छावाचे नेते माधवराव ताटे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!