अवैध गर्भपात करणार्‍या डॉ. सारसकरांचा पर्दाफाश; सारसकरांसह एका बोगस डॉक्टरला घेतलं ताब्यात

वाशिम,

शहरातील रमेश टॉकीज परिसरात असलेल्या एका दवाखान्यामधे अवैधरित्या गर्भपात करण्याचा गोरखधंदा सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या माहितीनुसार आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलीसांच्या मदतीने खासगी दवाखान्याची झाडाझडती घेतली. या तपासात संबंधीत दवाखान्यात गर्भपात करण्याचे सबळ पुरावे पथकाला मिळाले आहे.

शहरातील रमेश टॉकिज परिसरातील एका दवाखान्यात महिलेचा अवैधरित्या गर्भपात केला जात असल्याची गोपनीय माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभाग व पोलिसांनी काल रात्री उशिरा कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी एक महिला त्याठिकाणी आढळून आली आहे. ज्या महिलेचा गर्भपात केलं जाणार होतं. या महिलेला रात्री जिल्हा सामान्य रुग्नालयात हलविले आहे.

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा अंतर्गत तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणारे केंद्र अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपात होत असल्याबाबत माहिती देणार्‍या खबर्‍यांना शासनामार्फत बक्षीस देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!