ठसहयोगी भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाची जागतिक व्याप्ती‘ या विषयावर भारत आणि मलेशिया दरम्यान वेबिनार

नवी दिल्ली,

’सहयोगी भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाची जागतिक व्याप्ती‘ या विषयावर भारत आणि मलेशिया दरम्यान 17 ऑॅगस्ट 2021 रोजी वेबिनार आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाच्या , सरंक्षण उत्पादन विभागाने सोसायटी ऑॅफ इंडीयन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या (एसआयडीएम) माध्यमातून याचे आयोजन केले होते. आपल्या संरक्षण निर्यातीला चालना मिळावी, निर्यातीचे 2025 पर्यंत ठेवलेले 5 अब्ज अमेरीकी डॉलर्सचे लक्ष्य साध्य करावे यासाठी परदेशी देशांबरोबर सुरु असलेल्या वेबिनार मालिकेचा हा एक भाग होता.

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन उद्योग विभागाचे (डीआयपी) संयुक्त सचिव श्री अनुराग वाजपेयी यांच्यासह उभय देशांचे वरिष्ठ अधिकारी वेबिनारमधे सहभागी झाले. भारताची सरंक्षण उत्पादने जागतिक दर्जाची आणि अतिशय किफायतशीर असल्याचे संयुक्त सचिवांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. भारतात जागतिक दर्जाच्या सार्वजनिक आणि खाजगी जहाजबांधणी कंपन्यांसह सशक्त जहाजबांधणी व्यवस्था असल्याचेही ते म्हणाले.

भारत, विमानवाहू युद्धनौकांच्या देखभाल, दुरुस्ती आणि समग्र कामकाजाचे केन्द्र म्हणून स्थान निर्माण करत आहे. या क्षेत्रात उभय देश सहयोगी होऊ शकतात यावर त्यांनी भर दिला.

वेबिवार दरम्यान सीआयडीएम-केपीएमजी ने तयार केलेल्या ज्ञानप्रबंधाचे प्रकाशनही झाले.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स, एल अँड टी डिफेन्स आणि भारत फोर्ज लिमिटेड यासह नऊ भारतीय कंपन्यांन सादरीकरणे दिली. मलेशिया तर्फे, एरोस्पेस टेक्नॉलॉजी सिस्टम्स कॉर्पोरेशन, एएमपी कॉर्पोरेशन, डेफ्टेक मानवरहित सिस्टम्स आणि इनोपेक एसडीएन बीएचडी यांनी कंपनीचे सादरीकरण केले.

वेबिनारमधे 150 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले तर 100 पेक्षा अधिक आभासी स्टॉल्स प्रदर्शनात होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!