वसतीगृहाच्या प्रस्तावासाठी मुदतवाढ

जालना,

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 15 जुन 2021 अन्वये जालना जिल्हयातील घनसावंगी व अंबड तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी प्रत्येक एक वसतीगृह सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली असुन एकुण चार वसतीगृहे सुरु करण्यासाठी भाडेतत्वावर सर्व सोयी सुविधा युक्त 100 चौरस फुटापर्यत याप्रमाणे या वसतीगृहासाठी दहा हजार चौरस फुटापर्यत क्षेत्रफळ असावे दहा विदयार्थी मागे एक स्नानगृह व एक स्वच्छतागृहे असावे पाणीपुरवठा व विदयुत पुरवठा व पथदिवे सह ईतर सुविधा असाव्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित भाडे दराने इमारत भाडं तत्वावर देणार्‍या इच्छुक इमारत मालकांनी सविस्तर अटी शर्ती व अर्जासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना या कार्यलयात कार्यालयीन वेळेत दि.26 जुलै 2021 सायंकाळी 5.00 वाजेपर्यत संपर्क करण्याचे सुचविले होते तसेच दि. 6 ऑगस्ट2021 सायंकाळी 5.000 वाजेपर्यत विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषगाने अंबड येथील 1 प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाला आहे व घनसावंगी येथील एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने सदर प्रस्तावासाठी वेळ वाढवुन देण्यात येत असुन दि.3 सटेबर 2021 सायंकाळी 5.000 वाजेपर्यत विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!