पशुवैद्यकांसाठींचे प्रशिक्षण संपन्न
जालना,
अॅनिमल राहत , सांगली व महाराष्ट्र पशुसंवर्धन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील तज्ञ पशुवैद्यकांना बैलामधील वेदनारहीत खच्चीकरणाचे प्रशिक्षण दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय जालना येथे निकृष्ट वळुचे वेदनारहीत खच्चीकरण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
सदर प्रशिक्षणासाठी डॉ. एस.के. कुरेवाड जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , जालना डॉ. एम .एन. कंधारे , सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन , डॉ. डी .एस. कांबळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद जालना ,डॉ. अमितकुमार दुबे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय, जालना यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यात अॅनिमल राहतचे डॉ. चेतन यादव क्वालीटी अॅश्युरन्स मॅनेजर व वरिष्ठ प्राणी कल्याण अधिकारी श्री. सुनिल हवालदार यांनी परिश्रम घेतले.
पशुसंवर्धन विभाग जिल्हा जालनाच्या सहकार्याने अॅनिमल राहत संस्था कष्ट करणार्या प्राण्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी समर्पित आहे. यापुर्वी कोल्हापुर ,सांगली ,सातारा , सोलापुर , रत्नागिरी ,जळगांव , उस्मानाबाद ,बीड , लातुर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात सदर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले व वळुचे खच्चीकरण योग्य वेदनाशामकाशिवाय करणे वळूंना वेदनाकारक आहे वेदनाकारक असेल, असे अॅनिमल राहतचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. नरेश उप्रेती यांचे मत आहे. राज्यातील प्रत्येक उर्वरित जिल्ह्यात सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण हे पशुंना मानवीय पध्दतीने हाताळणी करणे आणि वळूंना काबु करणे यावर लक्ष केंद्रित करेल. उपशामक , वेदनाशामक आणि निस्तेजक औषधांचा एकत्रित वापर करुन बैलांना खच्चीकरणापुर्वी भूल देऊन आणि खच्चीकरणानंतर वेदनेचे व्यवस्थापन करण्यासाठी वेदनाशामक औषधाने उपचार करणे सोईचे ठरेल . वेदनारहित खच्चीकरणाची पध्दत पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकांना प्रगत पध्दती व मानवी पध्दतीचा अवलंब करण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी हितकारक ठरेल आणि कोणताही पशु हिंसक प्रक्रियेला भविष्यात सामोरे जाणार नाही याची पशुसंवर्धन विभागामार्फत दक्षता घेण्यात येईल. पशुंना वेदनारहित करणे हा प्रशिक्षणाचा उद्देश असल्याचे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.