बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरुन पडळकर संतापले, ‘बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार, अफगाणिस्तानवरुन तालिबान नाही‘

सांगली,

राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना या प्रकरणावरुन राजकीय वातावरण ही तापत असल्याचं दिसत आहे. बैलगाडी शर्यतीवरची बंदी हटवावी या मागणीसाठी गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑॅगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथे भव्य बैलगाडी छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. त्याची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. मात्र आजपासून पोलीस या ठिकाणी नाकाबंदी लावणार आहेत.

गोवंशाची शान आणि शेतकर्‍याची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग-ेसवाले करत आहेत. राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या स्थानावर्ती नाकाबंदी करून शेतकर्‍याचा विश्वासघात करणार आहेत. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तान हुन कोणी तालिबान येणार नाहीत अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोवंशाची शान आणि शेतकर्‍याची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग-ेसवाले करत आहेत. यांनी मागील दोन वर्षांत ना तारीख काढली ना अद्यादेश काढता आला. जेव्हा मी शर्यत घ्यायचं ठरवलं त्यावेळी राष्ट्रवादी शेतकर्‍यांबरोबर बैठक घेऊन आमचा शर्यतीला विरोध नाही. राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या स्थानावर्ती नाकाबंदी करून शेतकर्‍याचा विश्वासघात करणार आहेत अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

आज पासूनच सर्वत्र नाकाबंदी लावण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तान हुन तालिबान येणार नाहीत. तुमची दुटप्पी भूमिका शेतकर्‍यांना कळत आहे. जर बैलगाडी आणि शेतकर्‍यांवर प्रेम असेल तर राजकारण करू नका असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!