रभाग क्र.6 मराठा बिल्डींग, चरवाईपूरा परिसरात खराब रस्ते व सांड नालीच्या घाण पाण्याचेे साम्राज्य
जालना,
प्रभाग क्र. 6 (मराठा बिल्डींग, चरवाईपूरा) हा परिसर शहराच्या मध्यभागी व मुख्य बाजार पेठाचा भाग असून येथील अवस्था मागील 20 वर्षापासून जशीची तशी आहे. तत्कालीन नगरसेवक स्व.शंकर कालुरामजी खरे यांच्या कार्यकाळात सिमेंट रोड तयार झाले होते. तद्?नंतर त्याच्या पश्चात कोणत्याही आजी-माजी नगरसेवकांनी या परिसरात डोकावून पाहिले नाही. सध्या या वार्डाची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून या परिसरात पायी चालण्यासाठी रस्ते नाही जिथे तिथे घाणीचे साम-ाज्य पसरले असून 10 ते 15 दिवस नाल्या साफ होत नाही, कचरा उचलला जात नाही, यामुळे पावसाळ्याचे दिवस असून रोगराई पसरत आहे व येथील नागरिकांचे जिव धोक्यात आहे. या परिसरातील नागरिक नगर परिषदेचे टक्स 90म टक्के देत असून मुलभूत सुविधेपासून 20 वर्षापासून वंचित आहे. प्रभाग क्र. 6 हा परिसर शहरातील मुख्य बाजार पेठ असल्यामुळे येथे शहरातील लोकांची वर्दळ जास्त असल्या कारणामुळे हा परिसरात जशी सुविधा पाहिजे तशी सुविधा आजपयर्ंत मिळाली नाही. त्याअनुशंगाने प्रभाग क्र.6 चे नागरिक येणार्या नगर परिषदेच्या निवडणूकीला सामुहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय केलेला आहे. जो पयर्ंत मुलभूत सुविधा आमच्या प्रभागाला मिळत नाही तो पयर्ंत निवडणूकीला बहिष्कार चालु राहील. शहरातील लहान-सहान गल्ली बोलातील सिमेंटकरण व अंडर ग्राऊंड नालीचे काम जवळपास झालेले आहे. पण या परिसरातील रस्ते व नाल्याची दुरवस्था भविष्यात कधी दुर होणार यांची चिंता येथील नागरिकांना झालेली आहे. जालना शहरात कधी नगर परिषदेचे टॅक्स न भरणारे व विद्युत बिल न भरणारे असे अनेक लोकवस्त्यामध्ये उच्चवर्गी वस्त्यासारख्या सुविधा प्राप्त झाल्याअसून प्रभाग क्र. 6 मराठा बिल्डींग समोरच्या नागरिकांच्या मनात असे वाटू लागले की, ”” मेहनती खाय ढलिया और पांखडी खाय पुलाव ” विटंबणा अशी की सदर वस्तीतुन दोन आमदार व राज्यमंत्री आणि दोनदा नगराध्यक्ष दिले असून आज घडीला रेगिस्थानच्या वाळवंटासारखा सदर परिसर झाला आहे. कृपा करुन येणार्या निवडणूकीत पक्ष किंवा अपक्ष उमेदवारांनी नम- विनंती आहे की मतदान मागण्यासाठी आपण आपले अमुल्य वेळ वाया घालून नये कारण प्रभाग क्र.6 परिसरातील नागरिकांनी मतदानाला बहिष्कार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे असे निवेदनात सांगितले.
तसेच जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष घालुन या समस्यांचे निवारीकरण तात्काळ करावे, असे निवेदन जिल्हाधिकारी जालना यांना प्रभाग क्र. 6 परिसरातील नागरिकांनी दिले व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण व आंदोलन करण्यास बाद्य राहील असे शेवटी निवेदनातद्वारे परिसरातील त्रस्त नागरिकांनी सांगितले.