तूर्तास मराठवाड्याला पाणी सोडणे अशक्य – पालकमंत्री भुजबळ

नाशिक,

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नाशिकच्या धरणात 84 टक्के पेक्षा कमी जलसाठा असल्यास मराठवाड्यासाठी पाणी सोडणे बंधनकारक नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील धरणामध्ये अवघे 55 टक्के पाणी असल्याने तूर्तास तरी मराठवाड्यास पाणी सोडणे अशक्य असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने नाशिकसह मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने नाशिकसह मराठवाड्यातही भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. जायकवाडीत 65 टक्के पेक्षा कमी पाणी असल्यास नाशिक व नगरमधील धरणातून पाणी सोडावे लागेल. तर वरच्या धरणांमध्ये 84 टक्के पेक्षा कमी पाणी असल्यास जायकवाडीला पाणी देण्याची गरज नाही. सध्या जिल्ह्यातील धरणामध्ये अवघे 55 टक्के पाणी असल्याने तूर्तास तरी मराठवाड्यास पाणी सोडावे लागणार नाही, असे पालकमंत्री छगन भुजबळ यानी सांगितले आहे.

जास्त पाऊस पडला तरच आवर्तन देऊ

जिल्ह्यातील ग-ामीण भागात अद्यापही पिण्याच्या पाण्याची चिंता असून नाशिक व मराठवाड्यातही पाणी टंचाईच्या संकट आहे. ऑॅगस्टमध्ये पावसाने दांडी मारली आहे. ग-ामीण भाग कोरडाच असून आगामी काळात पाऊस न पडल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य आहे. आज पिण्याची समस्या नसली तरीही शेती, उद्योग यांचाही विचार करावा लागेल. जास्त पाऊस पडला तरच आवर्तन देऊ. कारण पाणी नसल्याने आवर्तन देण्यास आज अडचणी आहेत. नदी, नाले कोरडे ठाक असून पाणी सोडले तर तिथपर्यंत पोहोचेल कसे पाणी राहिले तर ठेवून काय करायचे ते सोडावे लागते, असे देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहेत. आगामी काळात पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितले असून 21 ऑॅगस्टनंतर पावसाचा अंदाज देखील दिला आहे. त्यामुळे पुढील परिस्थितीनूसार निर्णय घेतला जाणार असून नागरिकांना पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!