दुचाकी चालकांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारकडून दुचाकीच्या नियमात मोठे बदल…

मुंबई ,

वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने दुचाकींच्या डिझाईन आणि मागील बसण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (चेठढक) तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या लोकांना काही नवीन नियम पाळावे लागतील.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, आता बाईकच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूंना हात धरण्यासाठी होल्डर आवश्यक आहे. हे हँड या होल्डरमुळे बाईकच्या मागे बसलेल्या लोकांना सेफटी मिळेल. जेव्हा बाईक चालक अचानक ब-ेक लावतो तेव्हा, हे हँड होल्डर खूप उपयुक्त ठरते.

आतापर्यंत बहुतेक बाईक्समध्ये हे फीचर नव्हते. यासह, दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीसाठी दोन्ही बाजूंनी कव्हर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जेणेकरून मागील व्यक्तीचे कपडे मागच्या चाकात अडकू नयेत.

बाईकमध्ये आता हलका कंटेनर बसवण्याच्या सूचनाही केंद्राने दिल्या आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमी पेक्षा जास्त नसावी. जर हा कंटेनर बाईकच्या मागच्या बाजूला ठेवला असेल, तर फक्त ड्रायव्हरला बाईकवर बसण्याची परवानगी असेल. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर, बाईकच्या मागे दुसर्‍या व्यक्तीला बसता येणार नाही. जर दुसरा व्यक्ती दुचाकीवर बसला असेल, तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल.

त्याचवेळी, जर हा कंटेनर मागील प्रवाश्यांच्या बसण्याच्या जागेच्या मागे ठेवला असेल, तर दुसर्‍या व्यक्तीला बसण्याची परवानगी दिली जाईल.

सरकारने टायरसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सुचवण्यात आली आहे. या यंत्रणेतील सेन्सरच्या माध्यमातून चालकाला वाहनाच्या टायरमधील हवेच्या दाबाची माहिती मिळते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!