काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू
हैदराबाद,
तालिबानींची अफगाणिस्तानात सत्ता येत असल्याने अनेक चिंतातूर नागरिकांनी अफगाणिस्तानातून पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जात असताना शेकडो नागरिकांनी खेचाखेच केली. यावेळी 5 जणांचा मृत्यू झाला.
काबुल विमानतळावर नागरिकांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. काबुलचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अमेरिकेच्या सैन्यदलाच्या ताब्यात आहे. अमेरिकेच्या सैन्यदलाने हवेत गोळीबार केल्यानंतर गर्दीची पांगापांग झाल्याचे अमेरिकेच्या अधिकार्याने म्हटले आहे.
काय आहे अफगाणिस्तानात स्थिती?
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अराजकता आणि बिघडलेल्या परिस्थितीमुळे रविवारी (15 ऑॅगस्ट) राजीनामा दिला आहे. अशरफ गनी यांनी अखेर तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सरकारने इस्लामी अतिरेक्यांना शरण आल्यानंतर अली अहमद जलाली यांना नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.
अफगाण तालिबानच्या ताब्यात जाणार?
अतिरेक्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील बर्याच भागांवर कब्जा केला आहे. आता ते राजधानी काबूलपासून फक्त 11 किलोमीटर दक्षिणेस सरकारी सैन्याशी लढत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सर्व बाजूंनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी तालिबानला आक्रमकता थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफागाणिस्तानच्या शेजारी देशांना आपल्या सीमा निर्वासितांसाठी खुल्या ठेवण्याचा आग-ह केला आहे.
कोण आहेत तालिबान?
अफगाणिस्तानात तालिबानचा उदय 90 च्या दशकात झाला. सोव्हिएत सैन्य परत आल्यानंतर तेथे अराजकाचे वातावरण निर्माण झाले, ज्याचा फायदा तालिबानने घेतला. त्यानंतर लगेच तालिबानने दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानातून आपला प्रभाव वाढवला. सप्टेंबर 1995 मध्ये तालिबानने इराणच्या सीमेला लागून असलेला हेरात प्रांत काबीज केला. 1996 मध्ये अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरून काढून काबूलवर कब्जा केला होता.