” त्या ”घटनेप्रकरणी विद्रोही पँथरची स्वातंर्त्यदिनी निदर्शने
जालना,
घनसावंगी तालुक्यातील अनिकेत घुगे या दलित तरुणाच्या मारेकर्यांची नार्को टेस्ट करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी विद्रोही पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने स्वातंर्त्यदिनी जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.
अनिकेत घुगे या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार गेल्या पंधरवड्यात उघडकीस आला. पोलीसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नार्को टेस्ट करून फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्रोही पँथरचे संस्थापक अध्यक्ष कपिल खरात , संस्थापक सचिव संदीप साबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वातंर्त्यदिनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आरोपींना फाशी द्या अशी घोषणाबाजी केली . झेंडावंदनानंतर पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल खरात ,सचिव संदीप साबळे, महाराष्ट्र प्रवक्ते राहुल उघडे ,मराठवाडा अध्यक्ष भास्कर बोर्डे, जिल्हाध्यक्ष गौतम चित्तेकर ,संदीप राठोड ,जिल्हा उपाध्यक्ष लाला चौधरी, सिकंदर खान, महेंद्र वाघमारे, आकाश जाधव, रवि जाधव, विशाल तेझाड ,माधव जाधव ,किरण गंगातीवरे ,अजय सुतार ,योगेश पैठणे, आकाश पारवे, लखन चित्तेकर ,जीवन दांडगे, ॠषिकेश मोरे, आकाश लहाने, सागर गायकवाड ,गोपी सिंग कलानी, चंद्रकांत गायकवाड, श्याम नवगिरे , गौतम तुपे, योगेश बोर्डे , महेंद्र नवगिरे, राजू शेळके, विजय कुलकर्णी, प्रवीण भिंगारे, गणेश डहाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.