मुंबई : लसीकरणाच्या अटीमुळे ग्राहकांनी मॉलकडे फिरवली पाठ

मुंबई,

राज्यात कोरोना आटोक्यात आला आहे. राज्य सरकराने काही निर्बंध शिथिल केले आहेत. यात अटी शर्तीसह शॉपिंग मॉल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मॉलमध्ये येणार्‍या ग-ाहकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले असावे, हे बंधन घातले आहेत. तर लसीकरणाचा वेग पाहता अनेकांना अद्याप लशीची पहिली मात्राही मिळालेली नाही. त्यामुळे मॉल उघडले तरी ग-ाहकांनी मात्र, मॉलकडे पाठ फिरवली आहे.

’मॉल सुरू होऊनही काहीच उपयोग नाही’ –

कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ग-ाहकांना मॉलमध्ये येण्याची परवानगी आहे. तसेच हा विषय फक्त ग-ाहकांना पुरता मर्यादित नसून मॉलमधील कर्मचार्‍यांनादेखील लागू करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 25 ते 45 वर्षे या वयोगटातील तरुण आहेत. या वर्गाचे लसीकरण मे महिन्यांत सुरू झाले. त्यामुळे कर्मचारी संख्यादेखील कमी दिसत आहे. ’हे नियम कायम राहिले, तर सद्य:स्थितीत मॉल सुरू होऊनही काहीच उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया ग-ाहकांनी दिली.

मॉल्स सर्व दिवस रात्री 10पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा –

मुंबईतील मॉलना परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, लसीकरण पूर्ण झाल्याची सक्ती असल्यामुळे मॉलकडे मुंबईकरांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. मॉलमध्येदेखील सुरक्षारक्षकांंचे दोन लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. अशांनाच आत जाण्यास परवानगी देत आहेत, असे चित्र मुंबईतील सर्वच मॉलवर दिसून येत आहे. राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणार्‍या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणार्‍या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!