भारतीय आयुर्विमा महामंडळ गोवा विभागाकडून ‘संजीवनी- लाईफ बियॉन्ड कॅन्सर‘ संस्थेला वाहन प्रदान

पणजी,

गोल्डन ज्युबिली फाउन्डेशन, भारतीय आयुर्विमा महामंडळ, गोवा विभागातर्फे सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, ‘संजीवनी- लाईफ बियॉन्ड कॅन्सर‘ या संस्थेला मोबाईल व्हॅन प्रायोजित करण्यात आली आहे. ही संस्था विना नफा तत्वावर कर्करोगाच्या रूग्णांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आणि भारतात कॅन्सर केयर सेवेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित आहे. मोबाईल व्हॅनचा हस्तांतरण समारंभ सी. विकास राव, क्षेत्रीय प्रबंधक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, यांच्या हस्ते आज हॉटेल ताज विवांता, पणजी येथे पार पडला.

कर्करोग हा एक असा आजार आहे जो भारतात वाढत आहे आणि वेळीच उपचार घेण्याकरिता त्या विषयी जागरूकता असणे फार महत्वाचे आहे कारण आजाराच्या सुरवातीस इलाज झाल्यास हा आजार निश्चितच बरा होऊ शकतो. भारतीय आयुर्विमा महामंडळाची ‘कॅन्सर कव्हर’ ही एक खास योजना आहे तसेच ‘आरोग्य रक्षक’ ही आरोग्य विमा योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ, गोवा विभाग, 31 मार्च 2021 पर्यंत सिंगल प्रिमियम मध्ये 73.27म आणि प्रथम वर्ष प्रिमियम मध्ये 36.76म वाढ दर्शवुन भारतात प्रथम क्रमांकावर होता. कोविड -19 च्या या आव्हानात्मक काळात, भारतीय आयुर्विमा महामंडळाने जास्तीत जास्त संभावित ग-ाहकां पर्यंत पोहोचुन त्यांना जीवन विम्याचे संरक्षण प्रदान करण्याचे एक विशेष कार्य हाती घेतले आहे . विमा पॉलिसीच्या खरेदी साठी ‘आनंदा’ ऑनलाईन अ‍ॅप सादर करण्यात आले आहे ज्या दवारे कोणतीही व्यक्ती एलआयसी कार्यालयाला भेट न देता आपला जीवन विमा खरेदी करु शकते. इ-पॉलिसी थेट पॉलिसीधारकाच्या ई-मेल मध्ये प्राप्त होते.

सी. विकास राव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम क्षेत्राने कुटुंबाला विमा संरक्षण देण्यासाठी आणि सामान्य लोकांमध्ये विमा संरक्षण वाढवण्यासाठी ‘हमारा परिवार – एलआयसी बिमा परिवार‘ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या योजने अंतर्गत, तीन किंवा अधिक सदस्यांची विमा पॉलिसी घेणार्‍या कोणत्याही कुटुंबाला प्रशंसा प्रमाणपत्र आणि फोटो फ्रेम देऊन भारतीय आयुर्विमा महामंडळा तर्फे सन्मानित केले जाईल. जीवन विम्या विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि ग-ाम पंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘बिमा ग्राम’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. व्याजदार कमी होण्याच्या सध्याच्या परिस्थितीत, भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे अतिशय आकर्षक अशा योजना आहेत. ज्या संभाव्या ग्राहकांना अपेक्षित असलेले सर्व लाभ जसे की- ”जीवन विमा, पेन्शन, आरोग्य विमा, सूक्ष्म विमा, तरलता, कर लाभ आणि गुंतवणुक लाभ’ मिळू शकतात.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!