पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते तीन अग्निशमन वाहनांचे लोकार्पण
गोंदिया,
जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नगरपंचायत गोरेगाव, नगरपंचायत अर्जुनीमोरगाव व नगरपरिषद आमगाव या तीन शहरांसाठी ह्या तीन नविन अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्या आहेत. या वाहनांचे लोकार्पण 14 ऑगस्ट रोजी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
प्रत्येक अग्निशमन वाहन हे 95 लाख रुपयाचे असून त्या वाहनांची क्षमता 4 हजार 500 लिटर पाण्याची आहे. यामुळे दुर्गम भागातील शहरांमध्ये व त्यांच्या आजुबाजूच्या परिसरांमध्ये आगीची घटना घडल्यास तात्काळ मदत पोहचविता येईल असे पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार सर्वश्री विनोद अग-वाल, अभिजीत वंजारी, सहेषराम कोरोटे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार आदेश डफळ, प्रभारी अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) प्रणोती बुलकुंडे उपस्थित होते.