गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे कडाडल्या आणि म्हणाल्या… ’तुमच्या बालिश पणाचा मला त्रास होतो’

बीड,

पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे. या घोषणा गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांकडून देण्यात आल्या. तर यावेळी घोषणाबाजीवरून, पंकजा मुंडे प्रचंड संतप्त झाल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी चांगलेच कार्यकर्त्यांना झापलं. चुकीच्या घोषणा देणार्‍यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, अंगार भंगार या काय घोषणा देतायत, हे संस्कार आहेत का आपले? अस म्हणत संतापलेल्या पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापले. भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी आले असता कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी घोषणा देणार्‍या कार्यकर्त्याना चांगलंच झापलं. यावेळी संताप व्यक्त करत तुमच्या बालिश पणाचा मला त्रास होतोय अस देखील त्या म्हणाल्या.

या जन आशीर्वाद यात्रेला भाजपचा झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. दरम्यान यावेळी मुंडे समर्थकांना गोपीनाथ गडावर दाखल होताच तीव- घोषणाबाजीला सुरुवात केली होती.

केंद्रीय मंत्री भागवत कराड हे आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे सुद्धा उपस्थित होत्या. याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळीपंकजा मुंढे यांनी समर्थकांची खरडपट्टी सुद्धा काढली मात्र, तरीही मुंडे समर्थकांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या. प्रचंड गदारोळात यात्रेला शेवटी सुरवात झाली. पंकजा मुंडे यांनी जनआशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे, प्रितम मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी आपले राजीनामा अस्त्र सुद्धा सुरू केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी समर्थकांची समजूत काढत राजीनामे मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचंही जाहीपणे सांगितले. आता भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेतही पंकजा मुंडे सहभागी झाल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!