भाजपा अध्यक्ष नड्डा यांनी विभाजन विभीषिका स्मृती दिन मनवण्याचा निर्णय ऐतिहासिक

नवी दिल्ली

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या भाषणाने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उद्या रविवार, 15 ऑगस्ट 2021 रोजी समारोप होणार आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून ’महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत एकूण 60 व्याख्यान पूर्ण झाली असून 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.दिलीप पांढरपट्टे हे व्याख्यानमालेचे समारोपीय भाषण करणार आहेत.

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर नामवंत मान्यवरांचे व्याख्याने झाली आहेत. व्याख्यानमालेच्या पूर्वाधात 44 आणि उत्तरार्धात 16 असे एकूण 60 व्याख्यान पूर्ण झाली आहेत.

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या विषयी –  डॉ दिलीप पांढरपट्टे हे प्रथितयश लेखक आणि कवी आहेत. त्यांनी एलएलएम, एमबीए या पदव्यांसह पीएचडी संपादन केली आहे. त्यांनी सनदी अधिकारी म्हणून 1989 मध्ये सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कारकिर्दिस सुरूवात केली. कोकण विभागाचे सहायक आयुक्त, रायगड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, कोकणविभागाचे प्रादेशिक विशेष अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हा परिषदांचे मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच धुळे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

प्रशासकीय सेवा बजावताना, डॉ. पांढरपट्टे यांनी आपली वांड्मयीन व साहित्यिक सर्जनशीलता फुलवित ठेवली आहे. ’घर वार्‍याचे, पाय पार्‍याचे’ हा ललित लेखसंग्रह, ’कथा नसलेल्या कथा’ कथासंग्रह, ’बच्चा लोग ताली बजाव’ विनोदी लेखसंग्रह, उर्दू शायर आणि शायरीचा परिचय देणारे ’शायरी नुसतीच नाही’, ’शब्द झाले सप्तरंगी’ मराठी गजल संग्रह, ’सव्वाशे बोधकथा’ बोधकथा संग्रह, ’डॉ. राम पंडित संपादित मराठी गजल’ तसेच कुळकायद्यातील घरठाण हक्काबाबत माहिती देणारे ’राहील त्याचे घर’ आदी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.

डॉ.पांढरपट्टे हे 22 जानेवारी 2020 पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण-  रविवार, 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत टि्वटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!