अयोध्यामध्ये रामलला चांदीच्या हिंडोलेवर विराजमान
अयोध्या,
उत्तर प्रदेशातील धार्मिक नगरी रामनगरी अयोध्यामध्ये रामलला 493 वर्षानंतर प्रथमच चांदीच्या झोक्यावर शुक्रवारी विराजमान झाले.
राम जन्मभूमी परिसरामध्ये दिर्घकाळा पासून अस्थायी गर्भगृहामध्ये विराजमान रामललाला शुक्रवारी नवनिर्मित चांदीच्या हिंडोलेवर विराजमान करण्यात आले. रामललाचे मुख्य अर्चक आचार्य सत्येंद्रदासनुसार विशेष पूजेनंतर रामललासह चारही भावांना विग-हाच्या झोक्यावर स्थापित केले गेले.
अयोध्यामध्ये रामलला श्रावणी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंध (राखी पौर्णिमा) पर्यंत याच चांदीच्या हिंडोलोवर विराजमान राहतील आणि त्यांना झोका दिला जाईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्यामध्ये रामललासाठी चांदीचा झोका तयार केला आहे. श्रावण शुक्ल पंचमी तिथीच्या हिशोबाने शुक्रवारी वैकल्पिक गर्भगृहामध्ये त्यांच्यासाठी झोका बसविला गेला. यावर रामललासह चारही भावांना विग-ह स्थापित करुन झोका दिला गेला
ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार शतकोत्तार पश्चात चांदीच्या झोक्यावर बसलेले भगवान श्री रामलला श्रावण पंचमीच्या शुभ दिनी जन्मभूमीमधील अस्थायी मंदिर परिसरात झोक्यावर श्री रामलला सरकार बरोबर चारही भाऊ झोक्याचा आनंद घेत आहेत.
अयोध्यातील हजारो मंदिरांमध्ये प्रत्येक वर्षी श्रावण झोकात्सवाची परंपरा अनेक शतकां पासून सुरु आहे. तंबूमध्ये असतानाही रामललांच्या दरबारामध्येही परंपरेचे निर्वाहन मर्यादीतस्तरावर होत राहिले होते.
रामललाचा झोकात्सव श्रावण पौर्णिमा म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंत चालेल. रामललाला यापूर्वीपासूनच प्रत्येक वर्षी श्रावण शुक्ल पंचमी पासून पौर्णिमे पर्यंत झोक्यावर बसविले जाते आहे. परंतु हा झोका लाकडाचा होता.. या वेळी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललाच्या प्रतिष्ठेनुसार चांदीचा झोका तयार केला आहे.
9 नोव्हेंबर 2019 ला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर रामललाला तंबूच्या अस्थायी मंदिरातून बाहेर आणले गेले आणि नवीन अस्थायी मंदिरात विजरामान करण्यात आले त्यावेळे पासून रामललाचे सर्व उत्सव येथे साजरे होतात.