भाजप नेत्यांकडून अजून काही गावांचे नाव बदलण्याची मागणी

लखनऊ प्रतिनिधी

8ऑगस्ट

उत्तर प्रदेशमधील मंत्री आणि आमदारांंची मागणी जर मानली गेली तर आगामी महिन्यामध्ये जवळपास एक डझनपेक्षा अधिक जिल्हे आणि गावांना नवीन नवे मिळतील.

राज्याच्या माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री गुलाब देवीनी मागणी केली की त्यांचा गृह जिल्हा संभलचे नाव बदलून पृथ्वीराज नगर किंवा कल्कि नगर ठेवले जावे.

गुलाब देवीनी म्हटले की जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संभलचे नाव बदलण्याची मागणी आहे. मोठया संख्येत लोक मला भेटण्यासाठी येतात आणि मी त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आपली मागणी सांगण्याचे आश्वासन दिले आहे. मी 12 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रस्ताव करत असून लोकांच्या भावना व्यक्त करेल.

फिरोजाबाद जिल्हा पंचायतने या आधीच एक प्रस्ताव मंजूर करुन जिल्ह्याचे नाव बदलून चंद्रनगर करण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार देवमणि द्विवेदीनीही एका प्रस्ताव मंजूर करत जिल्ह्याचे नाव बदलून चंद्रनगर करण्याची मागणी केली आहे.तसेच त्यांनी या आधीच सुलतानपूरचे नाव बदलून कुशभवनपुर करण्याचीही मागणी केली आहे.

द्विवेदी जे सुलतानपूरमधील लंभुआ विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत त्यांनी म्हटले की मी या आधीच राज्य विधानसभेत सुलतानपूरचे नाव कुशभवनपुर करण्याची मागणी उपस्थित केली आहे. या शहराची स्थापना भगवान रामाचा पूत्र कुशने केली होती. मी मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली त्यामुळे त्यांच्या समोर मागणी मांडू शकेल.

सुलतानपुर जिल्ह्याची अधिकृत वेबसाईटही द्विवेदींच्या दाव्याचे समर्थन करत आहे. यात लिहिले की मूळ शहर गोमतीच्या उजव्या किनारी होते. असे सांगितले जात आहे की भगवान रामाचा पूत्र कुशने याची स्थापना केली होती आणि सांगण्यात येते की त्याच्या नावावरुनच याला कुशपूर किंवा कुशभवनपूर नाव दिले गेले होते. या प्राचीन शहराला चीनी प्रवासी हेवन त्सांगद्वारा वर्णित कुशपूर तसेच जनरल कुनिघमद्वारा ओळखले गेले.

सहरानपूरच्या देवबंद विधानसभा मतदारसंघाचे आमदार बृजेश सिंहनीही देवबंदचे नाव बदलूनल देववंद्र करण्याची मागणी केली आहे. देवबंद इस्लामिक मदरसा दारुल उलूमच्या मतदारसंघासाठी ओळखले जाते आहे. त्यांनी म्हटले की प्राचीन हिंदू शास्त्रामध्ये या स्थानाला देववृंद म्हटले गेले आहे. मी 17 ऑगस्ट पासून सुरु होणार्‍या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

शाहजहाँपूरच्या दादरौल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मानवेंद्र सिंहनी सांगितले की त्यांच्या भागातील लोकांना वाटते की शाहजहाँपूरचे नाव बदलून शाजीपूर केले जावे जे महाराणा प्रतापच्या जवळचे भामाशाहाचे दुसरे नाव आहे.

शाहजहाँपूरचे अजून एक भाजपचे आमदार वीर विक्रम सिंह प्रिंसने म्हटले की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील खुदागंज ब्लॉकचे नाव बदलण्याची मागणी केली होती. या ब्लॉकचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!