मध्यप्रदेश सरकार विवेक आणि नीलकांताला एक-एक कोटी देतील
भोपाळ प्रतिनिधी
5 ऑगस्ट
टोकिओ ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करून कास्य पदक जिंकले, भारतीय संघात मध्यप्रदेशशी संबंध ठेवणारे दोन खेळाडू विवेक सागर आणि नीलकांता शर्मा समाविष्ट आहे. या दोन्ही खेळांडूना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी एक-एक कोटी रुपये पुरस्कार म्हणून देण्याची घोषणा केली आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिली आहे. मुख्यमंत्री चौहाण यांनी भारतीय पुरूष हॉकी संघाद्वारे टोकिओ ऑलम्पिकमध्ये कास्य पदक जिंकण्यावर संघाला शुभेच्छा दिली आहे. मुख्यमंत्रींनी संघात समाविष्ट प्रदेशचे तरूण खेळाडू इटारसीचे विवेक सागर आणि मध्यप्रदेश हॉकी अॅकडमीचे नीलकांता शर्मा यांना सन्मान निधीच्या रूपात एक-एक कोटी रुपयाचा पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री चौहाण यांनी सांगितले की हे फक्त कास्य पदकच नव्हे, तर भारतीय हॉकीचे पुनर्जागरण आहे. भारतीय हॉकी संघाने जगाचे श्रेष्ठ संघ न्यूझीलंड, स्पेन, अर्जेंटीना, ग्रेट बि-टन, जर्मनी, जपानला पराभूत करून हा सन्मान प्राप्त केला आहे. मध्यप्रदेशासाठी विशेष रूपाने ही गर्वाची गोष्ट यामुळे आहे की आमच्या प्रदेशाचे इटारसी जिल्ह्याचे तरूण खेळाडू विवेक सागर या संघाचा घटक राहिले. त्यांनी ऑलम्पिक स्पर्धेत श्रेष्ठ प्रदर्शन करून भारतीय संघाचे अनेक श्रेष्ठ संघाविरूद्ध विजय देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. नीलकांता शर्मा देखील मध्यप्रदेश हॉकी अॅकडमीने निवड होऊन गेले होते.
मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले की राज्य सरकारद्वारे टोकिओ ऑलम्पिकचा कास्य पदक विजेता भारतीय पुरूष हॉकी संघाचाही सन्मान आणि स्वागत केले जाईल.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष शर्मा यांनी हॉकी संघाला शुभेच्छा देऊन प्रदेश सरकारद्वारे इटारसीचे विवेक सागर व मध्यप्रदेश हॉकी अॅकडमीने ट्रेनिंग घेणारे नीलकांता शर्मा जी यांना एक-एक कोटी रुपयाची सन्मान निधी देण्याचा निर्णय घेऊन उत्साहवर्धक पाऊल सांगून मुख्यमंत्रींचे अभिनंदन केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे टोकिओ ऑलम्पिकमध्ये जर्मनीला हरऊन कास्य पदक जिंकण्यावर पूर्ण संघ व देशवासियांना शुभेच्छा देऊन म्हटले की वर्षानंतर मिळालेल्या या विजयाने देशाचेी मान अभिमानाने उच झाले आहे.