न्यायाधीश आनंद यांच्या मृत्यूचा तपास करण्याचे झारखंड उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
रांची प्रतिनिधी
3ऑगस्ट
अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूशी संबंधीत पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ला लवकरात लवकर तपास सुरु करण्याचे निर्देश झारखंड उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.
झारखंड उच्च न्यायालयाने सीबीआयला सर्व रसद उपलब्ध करणे व दस्तऐवज उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयच्या वकिलांनी स्वीकारले की सीबीआय तपासासाठी शिफारस पत्र प्राप्त झाले असून याला बुधवार पर्यंत अधिसूचित केले जाईल.
उच्च न्यायालयाने झारखंडच्या डीजीपीना राज्यातील न्यायिक अधिकार्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचेही निर्देश दिले आहेत. न्यायालयाने डीजीपीना न्यायाधीशांच्या घरामध्येही सुरक्षा रक्षकाची तैनाती सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. तसेच न्यायालयाने जाणून घेतले की जर घटना सकाळी 5.08 वाजता घडली तर दुपारी 12.45 वाजता प्राथमिकता कशामुळे नोंदवली गेली.
झारखंड सरकारने प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती परंतु नंतर त्यांनी न्यायाधीशांच्या मृत्यूची सीबीआय तपासाची शिफारस केली.
अतिरीक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) ने अॅटोरिक्शा चालक लखन वर्मा आणि त्याचा सहयोगी राहुल वर्मासह एकूण 17 लोकांना अटक केल्यानंतरही प्रकरणात आता पर्यंत कोणतीही प्रगती झालेली नाही.
पोलिसांनी या प्रकरणात आता पर्यंत 240 पेक्षा अधिक जणांची चौकशी केली आहे परंतु अजून पर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहचू शकले नाहीत. आता दोन मुख्य दोषी आणि अॅटो रिक्शेच्या मालकाची नार्को टेस्ट करण्यावर विचार केला जात आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की दोनी मुख्य गुन्हेगार तपासामध्ये जास्त सहयोग करत नाहीत आणि दावा करत आहेत की ते दारुच्या नशे होते. या थ्येअरीला पोलिस टिम मानत नाही.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या आधीच या घटनेचा सीबीआय तापसाची शिफारस केली आहे. तर उच्च न्यायालय स्वत:तपासाची देखरेख करत आहे.
न्यायाधीश उत्तम आनंद यांचा 28 जुलैला सकाळी फिरायला गेले असता एका अॅटो रिक्शाने धडक दिल्याने मृत्यू झाला होता.