मध्यप्रदेशात विषारी दारूच्या दोषीला फाशीची शिक्षा होणार
भोपाळ प्रतिनिधी
3 ऑगस्ट
मध्यप्रदेशात अवैध आणि विषारी दारूचे समोर येणार्या मामल्यावर सरकारचे वर्तन कठोर झाले आहे आणि कॅबिनेटच्या बैठकीत विषारी दारूच्या दोषींना आजीवन कारावास आणि फाशी शिक्षेच्या तरतुदीला मंजुरी दिली गेली. राज्याचे गृहमंत्री डॉ, नरोत्तम मिश्रा यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीच्या निर्णयाचे विवरण देऊन सांगितले की, अशीदारू ज्याच्या सेवनाने जिव जातो, त्यात दोषी सिद्ध झाल्यावर आजीवन कारावास आणि फाशीच्या शिक्षेची तरतुद केली गेली. आतापर्यंत अशा मामल्यामध्ये पाच ते दहा वर्षाच्या शिक्षेची तरतुद होती. तसेच दंडाची रक्कम 10 लाखने वाढून 20 लाख केली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की मध्यप्रदेशात अवैध दारूवरून वाढणार्या गुन्हेगारी हालचालीवर रोख लावण्यासाठी आबकारी कायदा दुरूस्ती विधेयक-2021 चे कॅबिनेटने आज (मंगळवार) अनुमोदन केले. नवीन धोरणात हॅरिटेज मदिरा यांच्या एक नवीन श्रेणी देखील जोडली गेली आहे.
राज्य सरकारद्वारे विषारी दारूच्या मामल्यात फाशी शिक्षेच्या तरतुदीवर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अंकुश कसून सांगितले, फक्त कायदा बनवण्याने माफिया कधी समाप्त होणार नाही, कायद्याचे क्रियान्वयन खुप आवश्यक आहे, सरकारची दृढ इच्छाशक्ती दिसायला पाहिजे.
त्यांनी मागील वेळेत बनवलेल्या कायद्याची आठवण करून सांगितले, कठोर कायद्याची चर्चा केली तर बहिण-मुलींच्या सुरक्षेवरही सरकारद्वारो वर्षापासून केली जात आहे परंतु प्रदेशात आजही बहिण-मुली सुरक्षित नाही.
उल्लेखनीय आहे की राज्यात मागील काही कालावधीपासून अवैध आणि विषारी दारू विक्रीचे मामले सतत समोर येत आहे. अनेक स्थानावर तर विषारी दारूच्या सेवनाने लोकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकारच्या मामल्यावर राज्याचे राजकारण देखील खुप तापले आहे. हेच कारण आहे की राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी काही दिवसापूर्वी या गोष्टीचे संकेत दिले होते की राज्य सरकार आगामी दिवसात याप्रकारच्या व्यापारात सहभागी लोकांवर कठोरतम कारवाईचा कायदा बनवण्याचा निर्णय घेऊ शकते.