सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडीओची दखल घेत पालकमंत्री ना अदिती तटकरे पोहोचल्या कोंडीवते पुरग्रस्त गावांमध्ये

पोलादपूर प्रतिनिधी

2 ऑगस्ट

22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेले महाड आणि पोलादपूर तालुक्यातील जनजीवन पुर्वपदावर येत असताना सोशल मिडिया वर कोंडीवते या 2005च्या दरडग्रस्त गावातील कौचाली मोहल्यातील वाहून गेलेल्या घरासमोर इम-ान कौचाली या तरुणाने तयार केलेला व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल झाला. रायगडच्या पालकमंत्री ना अदिती तटकरे यांच्या पयर्ंत हा व्हिडिओ पोहोचल्यावर त्यांनी तातडीने या कोडीवते गावाची माहिती घेऊन रविवारी सायंकाळी उशिरा या गावाला भेट दिली.

22, जुलै रोजी सावित्री नदीच्या पात्रालगतच वसलेल्या कोंडीवते गावातील कौचाली मोहल्यातील इम-ान कौचाली याने शुक्रवारी एक व्हिडीओ व्हायरल केला.

सोशल मिडिया वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दखल रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी घेतली. कोंडीवते हे गाव 2005 च्या अतिवृष्टी, महापूर व भुस्खलनामधील बाधित गांव आहे. येथील पुनर्वसन वसाहतीत यावेळी चक्क सात फुटांपेक्षा अधिक पुराचे पाणी शिरले. पालकमंत्री ना.तटकरे यांनी प्रथम पुनर्वसन वसाहतीमध्ये जाऊन माहिती घेतली तेथून कौचाली मोहल्याकडे जाऊन तेथील तरुण व बुजुर्ग लोकांसोबत चर्चा केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक खलफे यांनी आवर्जून उपस्थित राहून कौचाली मोहल्ल्यातील समस्या मांडण्यासाठी इम-ान कौचाली याला साथ दिली.

वाहून गेलेल्या घरातील एक व्यक्ती वाहून गेल्यामुळे प्रथम त्याची नोंद बेपत्ता म्हणून करण्यासाठी यावेळी पालकमंत्री ना तटकरे यांनी निर्देश दिले. ग्रामस्वच्छता व अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह जिओलाजिकल सर्व्हे करण्यात येऊन लवकरच कोंडीवते गावाबाबत योग्य निर्णय नियोजन पुर्वक घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री ना. तटकरे यांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!