संसदेतील गदारोळ को केंद्र सरकार जबाबदार – ओवैसी
हैदराबाद प्रतिनिधी
2 ऑॅगस्ट
संसदेचे अधिवेशन वारंवार स्थगित होण्याला केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार जबाबदार आहे, असा आरोप एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. संसदेचे मान्सून अधिवेशन सुरू आहे. मात्र, पेगासस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधक आणि सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे.
असदुद्दीन ओवैसी हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, विरोधक पेगासस, कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान झालेले लोकांचे मृत्यू, कृषी कायद्यांसह शेतकर्यांचे आंदोलन यांसारख्या विषयावंर चर्चा करायला इच्छित आहे. मात्र, सरकार या विषयांवर चर्चा करायला आणि या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार नाही.
ऑॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआईएमआईएम) पक्षाचे अध्यक्ष ओवैसी यांनी विचारले की, ’संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. पेगासस विषयावर चर्चा व्हायला हवी. सरकार का घाबरलेली आहे? ते काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला. ते म्हणाले, ’विरोधकांची इच्छा आहे की, सभागह चालले पाहिजे. मात्र, सरकारची इच्छा नाही. सरकारला सभागृहातील गदारोळादरम्यान, विधेयके पारित करुन घ्यायचे आहेत. काय हीच लोकशाही आहे?’ असा प्रश्नही त्यांनी केला.
ओवैसींनी आरोप केला की, काय संसद चालवणे सरकारची जबाबदारी नाही का? विरोधक संसदेत बोलतील सरकारला ऐकावे लागेल. तुम्ही याचा स्विकारा अथवा नकार द्या. आम्हाला बोलण्याची संधी दिली जात नाही आहे, आरोपही त्यांनी केला.