आज ओझर येथे भारतीय शहीद पोलीस स्मृती आणि एकता दिन साजरा
ओझर प्रतिनिधी-(जुबेर शेख)
ओझर येथे भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते. शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी बाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी व त्यांच्या मनात शहिदांच्या हुतात्माची जाणीव आणि शहिदाच्या कुटुंबाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने भगवा चौक येथे नाशिक ग्रामीण पोलीस बँड पथकाने जागेवर संचलन करण्यात आले.संचलन सुरू असताना ओझर गावातील लोकांनी सोशल डिस्टिक पालन करून मास्क लावून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली