शेतकरी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी खडक माळेगाव येथील पुल बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या प्रवाशांच्या हाल अपेष्टा संपणार तरी कधी ?
निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)
खडकमाळेगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील शेलू नदीला मोठापूर आल्यामुळे खडकमाळेगाव ता. निफाड येथील वसेवाडी या ठिकाणी असलेल्या तात्पुरत्या पुलावरील माती व दगडांचा सर्व भराव वाहून गेला त्यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या वसेवाडी शिवारातील व रायतेवस्ती शाळेजवळील नागरिकांची,शेतकऱ्यांची शालेय तसेच महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे . प्रशासनाने कुठलीही मदत न केल्यामुळे परिसरातील रहिवासी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो यामुळे येथील रिहवाशांचा गावाशी संपर्क तुटतो. तसेच शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही गैरसोय होते. नदीचे पाणी ओसरल्यावर जीव मुठीत धरून नदीवरील.कमकुवत पुलावरून मार्गक्र मण करावा लागतो. नदीवरून पायी जाणे तर दूरच मोठे वाहन देखील जात नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रिसाठी घेऊन जातांना मोठी गैरसोय निर्माण होते.
शिवारातील नागरिकांनी एकत्र येत पुलावर पुराच्या पाण्याने वाहून आलेले काटेरी झुडपे,कचरा स्वतः पाण्यात उतरत मोकळा केला लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन याठिकाणी पूल बांधण्यात येऊन गेल्या अनेक वर्षांपासूनची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी वसेवाडी शिवारातील व रायतेवस्ती शाळेजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. संबंधीत विभागाने याची दखल घेऊन नदीवर पूल बांधण्यात येऊन येथील रहीवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जेष्ठ नागरिक माधव रायते ,शरद रायते,नारायण रायते,धोंडू रायते,शिवाजी रायते,विठ्ठल रायते,बबन गांगुर्डे ,मदन रायते,राहुल रायते,रवींद्र रायते,मेघनाथ राजोळे ,प्रमोद रायते,रमेश रायते,स्वप्नील राजोळे,वाल्मिक रायते,शरद रायते,तुषार रायते,अमोल राजोळे ,अनिल रायते,प्रकाश रायते,पिनुतात्या रायते,विठोबा रायते,जनार्दन रायते,केशव गांगुर्डे ,सागर रायते,मल्हारी रायते आदींनी केली आहे .
नदीचे पाणी कमी झाले तरी या पुलाजवळ मोठा डोह असल्यामुळे आठ महिने पाणी साचलेले असते कच्चा अरुंद पूल त्याला कुठलेही कठडे नाही त्यामुळे रायतेवस्ती जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी मधील लहान लहान चिमुकल्यांना जीव मुठीत धरून दररोज प्रवास करावा लागतो.
प्रमोद रायते पालक खडक माळेगाव.