अनमोल असलेल्या मनुष्य देहाला भक्ती मार्गाची गरज
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
मानवी जीवनाचा विचार करता मनुष्याला जिवन जगत असताना ज्या प्रमाणे अन्न,वस्र आणी निवारा हे तीन मुलभुत गरजेचे घटक मानले जातात, त्याच प्रमाणे मनुष्याला भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून किंवा मोक्षपदाला जाण्यासाठी भक्ती, ज्ञान आणी वैराग्य या तीन महत्वपूर्ण गोष्टी विचारात घेतल्या जातात, मानवी जीवनामध्ये भक्ती हे अतिशय सोपं साधन आहे ,भक्ती जर प्रेमाने केली तर भगवंत आपल्या भक्तावर प्रसन्न होतात , भगवंताला आपल्या भक्ती मध्ये प्रेमळ भावाची अपेक्षा असते कारण तुकाराम महाराज देखील एका ठिकानी वर्णन करतात की , थोर प्रेमाचा भुकेला । हाची दुष्काळ तयाला॥ आपल्या संसारात सुखाच्या अपेक्षेने रममाण झालेला मनुष्य काळाच्या ओघात वाहत जाताना भक्तीच्या ऊर्ध्व दिशेने वाटचाल करताना दिसतो ,संसारात असलेले सूख काही कालावधी पुरते मर्यादीत असते परंतू भगवंताच्या भक्तीत मिळणारे सूख हे अखंडकाळ मानवाला आनंद देत असते, त्याचप्रमाणे ज्ञानाचा जर आपण विचार केला तर भक्ती च्या वाटेणे चालत असताना ” ज्ञान ” ही संकल्पना देखील महत्वाची आहे कारण मानवी जीवनात ज्ञानाची जोड नसेल तर मानूस डोळे असुन अंध आहे असे समजले जाते ,समाजातील जडण घडणी मध्ये ज्ञानाचा मोठा वाटा आहे ,कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जो सर्वसामान्य जनतेला सहजरित्या समजू शकतो, आशा ग्रंथाची रचना ज्या वेळी माऊली ज्ञानेश्वरांनी केली त्यावेळी अज्ञानी लोकांचा अज्ञानाचा पडदा नाहिसा झाला आणी परमार्थाचा खरा अर्थ सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यासमोर आला . ज्ञनियांचा राजा म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांची ओळख होते, कारण जगाच्या पाठीवर समाजकंटकांचा त्रास सहन करुन देखील समाजाचा विचार करणारे वैराग्य वृत्ती धारण करणारे संत आता होणे नाही , जे समाजाच्या हितासाठी स्वताच्या सुखाचा त्याग करतात ते खरे संत , आपल्या लेकराच्या दुखात जसा आईला त्रास होतो तोच त्रास सहन करतात ते खरे संत लेकूराचे हित । वाहे माऊलीचे चित्त ॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लभाविंन प्रीती ॥ आपल्या समान्य लेकरांच कल्याण व्हावं यासाठी स्वता आईप्रमाने स्वहिताचा त्याग करुन या जगाच्या कल्याणासाठी ज्यानी वैराग्यत्व स्विकारले असे संत या जगाच्या पाठीवर होऊन गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती । राहिल्या त्या किर्ती जगमाजी॥ आज संत जरी हयात नसले तरी पन त्यांच्या कार्याची किर्ती अजरामर आहे , वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी ।आता ऐसे कोनी होणे नाही॥ वैराग्य वृत्ती धारण करुन समाजाचं कल्याण संतानी केलं आता होणं अशक्य
जगाच्या कल्याणासाठी स्वताला त्रास करुन घेनारे संत मनुष्याला भक्ती ज्ञान वैराग्य या तिन गोष्टींची प्रचिती करुन देत असतात .