चांदवडला कोवीड प्रतिबंधक लसीकरण अभियान
निफाड प्रतिनिधी– (रामभाऊ आवारे)
राष्ट्रीय पोषण माह सप्ताहानिमित्त 30 सप्टेंबर 2021 रोजी विद्यार्थी व विद्यार्थिनीं पालकांना जिल्हा परिषद शाळा नैताळे येथील शाळेत नैताळे शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री पांडुरंग कर्डीले सर यांनी मार्गदर्शन केले,याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तू भवर,राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे,ग्रा पं सदस्य मा सरपंच नवनाथ अप्पा बोरगुडे ,अनिल सूर्यवंशी उपस्थित होते नैताळे शाळेतील पदवीधर शिक्षिका अरुणा महाजन मॅडम,उपशिक्षिका सौ सिमा बैरागी मॅडम,सारिका लोहारकर मॅडम,रंजना देवरे मॅडम,साधना वेताळ मॅडम,शोभा नागरगोजे मॅडम यांनी पोषण माह विशेष आयोजन केले,पोषण माह निमित्त विविध कडधान्य,पालेभाज्या यांचे उत्कृष्ट प्रदर्शन मांडले होते,अतिशय छान नियोजन केले होते मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख श्री पांडुरंग कर्डीले सर यांनी विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहाराविषयी माहिती दिली. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ असण्यासाठी आपण सकस व संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. भाजीपाला. फळ भाज्या ,कडधान्य ,फळे ,मोड आलेली कडधान्य यांचा समप्रमाणात सहभाग असावा. सकस आहार घेतल्यास आपला शारीरिक व मानसिक विकास योग्य प्रमाणात होतो. असे सांगितले. श्रीमती सारिका लोहारकर यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे आहार कसा घ्यावा व व्यायाम करणे तितकेच महत्त्वाचे असते अशी माहिती दिली. श्री नंदकिशोर घोडेकर सर यांनी प्रोटीन, कॅलरीज, जीवनसत्व पालेभाज्यांमध्ये जास्त असते तसेच सकस आहार घेतल्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते अशी माहिती दिली ,पोषण आहार सप्ताह साजरा करणेसाठी विद्यार्थी पालक,शिक्षक वृंद पदवीधर शिक्षक प्रकाश शिरसाठ सर,दिपक पाटील सर,दादा बोरसे सर,नंदकिशोर घोडेकर सर,नरेश्वर ठाकूर सर , शालेय पोषण आहारच्या श्रीमती विमल तुपलोंढे, श्रीमती शिलाबाई सोनवणे,मुमताज पठाण,सौ ज्योती साळुंखे यांनी सहभाग घेतला राष्ट्रीय पोषण महासप्ताह आयोजन करून जनजागृती केली याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीने सर्व शिक्षक वृंदाना धन्यवाद दिले कार्यक्रमास उपस्थितीचे स्वागत नैताळे शाळेचे मुख्याध्यापक तथा शिवरे केंद्रप्रमुख पांडुरंग कर्डीले सर यांनी केले, सूत्र संचलन नंदकिशोर घोडेकर सर यांनी केले आभार दिपक पाटील सर यांनी मानले .