नुतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुरगाणा -नाशिक येथे आज विद्यार्थिनीना आरोग्यविषयक वस्तूंचे वाटप व मार्गदर्शन.

प्रतिनिधी –

दिनांक 29/09/2021 वार बुधवार रोजी सकाळी ठीक 12:00 वाजता विद्यालयाचे प्राचार्य श्री पी. के. चव्हाण सर यांच्या आध्यक्षतेखली व प्रमुख अतिथी म्हणून डाग सेवा मंडळ यांच्या पदाधिकारी श्रीमती हेमलता बिडकर मॅडम , ज्येष्ठ समाज सेवक श्रीयुत सुपेकर सर यांच्या शुभ हस्ते व विद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनी ना नॅपकिन व आरोग्यविषयक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तसेच विद्यार्थिनीच्या आरोग्यविषयक माहितीपर सखोल अशी माहिती दिली.तसेच किशोरवयीन कालावधीत होणारे बदल लक्षात घेवून त्यावर विशेष अशी काळजी घेणे . आपल्याला येणाऱ्या अडचणी ह्या विद्यालयातील शिक्षिका यांना मनमोकळे पणाने सांगावे.असे मार्गदर्शन श्रीमती हेमलता बिडकर मॅडम यांनी विद्यार्थिनीने केले.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री पी. के .चव्हाण सर हे किती काळजी घेतात .प्राचार्य यांचे व विद्यालयाचे कौतुक जेष्ठ समाज सेवकमा.सूपेकर साहेब यांनी केले.
आध्यक्षिय मनोगतात मान.प्राचार्य यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी सुविधा ,विद्यालयात कोरोनाविषयक काळजी ,याविषयी मार्गदर्शन केले.
आलेल्या पाहुण्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
तसेच याप्रसंगी अटल लॅब नाशिक चे प्रमुख मां.श्री.थोरात साहेब उपस्थित होते. अटल लॅब मार्फत विद्यार्थ्याना दिली जाणारी सुविधा याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील पर्यवेक्षक,श्रीयुत एस व्ही.पवार सर यांच्यासह प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विध्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!