नरेंद्रगिरी महाराजांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा; नाशिकच्या साधू महंतांची मागणी

नाशिक,

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या अलाहाबाद येथे झालेल्या संशयास्पद मृत्यू नंतर नाशिकच्या साधू महंतांनी याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.अत्यंत कणखर आणि कार्यकुशल असलेले नरेंद्रगिरी महाराज यांच्याकडून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाऊच शकत नाही, असे देखील साधू-महंतांनी म्हटले आहे.

दरम्यान, या संशयित मृत्यू प्रकरणी थेट सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी नाशिक आखाड्यांच्या साधूंनी केली आहे. यावेळी नाशिकच्या भक्तिधाममध्ये महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महंत नरेंद्र गिरी महाराज यांचे निधन एक अनपेक्षित घटना असून त्यांनी गेली अनेक वर्षे अखंड परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. त्यांचा कुणीतरी घातपात केला असावा, या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नाशिकमधील आखाड्याच्या साधुंनी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!