पंचायत राज समितीने घेतला बैठकीत विविध विकास कामांचा आढावा

सुरगाणा पंचायत समिती सभागृहात पंचायत राज दौरा समितीचे प्रमुख डॉ. देवराव होळी, किशोर पाटील,किशोर जोरगेवार,अनिल पाटील आदी मान्यवर आढावा घेतांना

सुरगाणा प्रतिनिधी –

पंचायत राज समितीने पंचायत समिती सुरगाणा येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रविविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित गावित यांनी समितीचे प्रमुख आमदार डॉ. देवराव होळी, आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, किशोर जोरगेवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मात्र प्रत्यक्ष बैठकीतील आढावा दरम्यान प्रोटोकॉल मुळे
प्रसार माध्यमांना दुर ठेवल्या मुळे बंद दाराआड
विविध खात्यातील अधिकारी वर्गाकडून समितीने नेमके काय जाणून घेतले हे समजू शकले
नाही.

बैठकीनंतर
पंचायत समिती येथे 17 ऑगस्ट पासून खुंटविहिर,भवाडा, भदर बिवळ या ग्रामपंचायत मध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार तसेच आर्थिक अनियमितता झाल्या चा
आरोप करीत तेथील नागरिक उपोषणास बसले होते.त्यांच्या उपोषणास न्याय मिळावा म्हणून संबंधीत ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. हि बाब समितीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी माजी आमदार जिवा पांडू गावित, सुभाष चौधरी, उपसभापती इंद्रजीत गावित, सुरेश गवळी,अशोक धुम, राहुल आहेर, वसंत बागुल, भीमाशंकर पाटील,आनंदा चव्हाण, कासम वळवी, परशुराम गावित सह पक्षाचे कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. समितीस निवेदन सादर करुन
झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी ची मागणी केली.

तहसिलदार विजय सुर्यवंशी, गटविकास अधिकारी दिपक पाटील, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे आदिंनी उपोषणार्थींची समजूत काढल्यानंतर आमरण उपोषणाची दौरा समितीचे प्रमुख डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सांगता करण्यात आली. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रत्येकी एका प्रतिनिधीस
नाशिक येथे जिल्हा परिषदेच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी पाठविण्यास सांगितले. यावेळी
या संबंधीची ग्रामपंचयतीत जनतेच्या पैशाचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची सखोल चौकशी केली जाईल.तसेच त्वरित चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन उपोषणार्थींना देण्यात आले.
या बैठकीत विविध खात्यांचे अधिकारी गटविकास अधिकारी दिपक पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलिप रणवीर, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी भिंगारे, आदीसह सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!