..आणखी एखादा कार्यक्रम करेक्ट करू’, नाशकातून संजय राऊत यांची राणेंवर अप्रत्यक्ष टीका

नाशिक,

नाशिकमध्ये बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि खासकरून नारायण राणेंवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ’फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून करू. आपण कार्यक्रम करत राहू. कार्यक्रम करण्याची सवय आहे आणि कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही’. अशाप्रकारे नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा नारायण राणेंना त्यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, काय चर्चा झाली हे सर्वांना माहित आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. जे शरद पवार आणि राष्ट्रवादीशी देखील होते.

नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना उगाच कुणाला अंगावर घेणार नाही पण अंगावर आल्यावर सोडणार नाही असं यावेळी संजय राऊत म्हणाले. नारायण राणेंच्या अटकेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ’मुख्यमंत्र्यांनी कायद्यानं लगाम घातला. राणे आणि त्यांच्या पक्षानं आत्मपरीक्षण करावं. भाजपला याचा फटका बसणार आहे.’ शिवाय आम्ही नारायण राणेंना भाजपचा मानत नसल्याचंही राऊत म्हणाले. राणेंचा आम्ही दोनदा पराभव केला आहे. सत्तेत आल्यावर त्यांनी भान ठेवायला हवं असंही राऊत म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात या पुढे देखील शिवसेनेची सत्ता राहणार आहे. आज सरकार तीन पक्षांचं आहे, उद्या काय माहित एका पक्षाचं सरकार असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहतील असा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, ’महाराष्ट्रच्या मुख्यमत्र्यांना प्राईम मिनिस्टर इतका आदर मिळतो त्यामुळे यांचे पोट दुखते आहे. या पोटदुखीवर आमच्याकडे उपाय आहेत

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!