नाशिक : वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

नाशिक,

येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात एका डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला. डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे असे मृत डॉक्टरचे नाव आहे. तो गायनॅकॉलॉजिच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. तो एमडीच्या पहिल्या वर्षाला होता. या घटनेने खळबळ उडाली आहे.

स्वप्नीलच्या मृत्यू त्यांच्या कुटुबीयांनी रॅगिंग प्रकरणातून घातपात झाला, असा आरोप केला आहे. तर काही महिन्यांपूर्वी त्याने रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जूही गायकवाड आणि सिद्धि फुके या दोन मुली त्याला त्रास देत होत्या. रॅगिंग करणार्‍या या दोन मुलींसह महाविद्यालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, स्वप्नील शिंदे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाचे महाविद्यालय प्रशासनाने खंडन केले आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळोवेळी महाविद्यालयाने सहकार्य केले. मृत विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. तर मानसिक स्थिती ठीक नसल्याने मृत डॉक्टर विद्यार्थ्याच्या आईला मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!