ज्ञानेश्वर जाधव यांचा वाढदिवस अनाथ मुलांसमवेत साजरा
नाशिक:- महाराष्ट्रातील आत्महत्या शेतकरी मुलांचे असलेल्या नाशिक-त्रंबकेश्वर रोडवरील आधारातीर्थ आश्रमात अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांचा वाढदिवस अनाथ मुलांसमवेत केक कापून करण्यात आला. यावेळी आधारतीर्थ तील मुला – मुलींनी समाज प्रभोधनपर शेतकरी या विषयवार संस्कृतिक कार्यक्रम साधर करतांना कर्जबाजरी किंवा इतर कोणतेही संकट असो त्यास घाबरून न जाता किंवा आत्महत्यापर्यंत शेतकऱ्यांनी नये जाता यापेक्षा आपल्या मुलांचा- कुटुंबाचा विचार करून खंबीर व्हायला पाहिजे.अशी भावाना कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांकडून व्यक्त करण्यात आली.याशिवाय धार्मिक व शेतकरी विषयांवर आधारित येथील अनाथ मुलांनी गाणे सादर केले.
यावेळी अखील भारतीय मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते शिवमंदिरात आरती पूजन झाले. यानंतर अनाथ मुलांच्या समवेत ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी म्हसरूळचे जेष्ठ समाजसेवक प्रकाशतात्या उखाडे, गणेशभाऊ पेलमहाले,योगेशदादा पाटील,तुषारराजे भोसले,अखिल भारतीय मराठामहासंघाचे जिल्हाध्यक्षा अस्मिताताई देशमाने, रोहिणीताई उखाडे, सुचिताताई जाधव,वंदनाताई पेलमहाले,भाऊसाहेब पगार, आधारतीर्थचे त्रंबकराव गायकवाड आदीसह मान्यवरांसह आधारतीर्थचे सेवेकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गायकवाड यांनी केले. तर शेवटी उपस्थिताचे आभार अस्मिताताई देशमाने यांनी मानले. वाढदिवसाच्या निम्मिताने ज्ञानेश्वर जाधव यांना नाशिक मनपा गटनेते अरुण पवार,अखिल भारतीय मराठा महासंघ केंद्रीय कार्यकारणीचे चिटणीस प्रमोद जाधव, युवक समन्व्यक अतिष गायकवाड आदी मान्यवरांकडून दूरध्वनी द्वारे शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.