महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – डॉ अनिता पुदरोड

महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन

नांदेड (प्रतिनिधी) :-

महिलांनी सर्वात प्रथम स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तरच कुटुंबाकडे लक्ष देता येईल असे मत डॉ.अनिता पुदरोड यांनी व्यक्त केले आहे . जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग नांदेड आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र जागर महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात झुमद्वारे मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ अनिता पुदरोड यांनी आपले विचार व्यक्त केले आहे.यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आताच्या काळात महिलांचे आरोग्य ही एक गंभीर समस्या झाली आहे.कारण बदलत्या काळानुसार धावपळीच्या जगात महिला स्वतःच्या आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत हे सर्वेक्षणातून पुढे आलेले आहे.किशोरवयीन मुलीपासून ते रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत महिलांमध्ये अशक्तपणा(एनिमिया)हा असतोच किशोर वयीन मुलींना त्या विशिष्ट वयात शारीरिक व मानसिक बदलांकडे पालकांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.गर्भधारणेपासून ते प्रस्तुती पर्यंत एक सुदृढ बाळ जन्माला यावे म्हणून घेतली जाणारी काळजी ,आहार,औषधी , डॉक्टरांचा सल्ला यावर द्यावा.मासिक पाळी ,लालदपदर,श्वेतपदर इतकेच नव्हेतर गर्भपिशवीतील गाठी ,सूज , स्तनांचा कॅन्सर ,गर्भाशयाचा कॅन्सर असे अनेक गंभीर आजारांच्या अवस्था समोर येतात.तेव्हा न घाबरता व्यवस्थित चांगल्या पद्धतीने योग्य वेळी योग्य उपचार घेण्याची आवश्यकता आहे.उच्च रक्तदाब , मधुमेह,वंध्यत्व, गर्भधारणानंतर येणारे आजार , सुदृढ़ बालक जन्माला यावे म्हणून वेळोवेळी होणारी सोनोग्राफी यामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण , जनजागृती प्रमाण, स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जनन संस्थेची काळजी गर्भाशयाचा कॅन्सर, रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत घेतली जाणारी काळजी याबद्दल विस्तृत माहिती दिली.भारतातील महिलांना स्तनांचा कॅन्सर होण्याचा धोका बारा टक्के असतो.स्तनांचा कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो.अशी वैद्यकीय माहिती पुरवली गेली पाहिजे.आरोग्याची काळजी व त्यावरील उपाय यावर अजून ही जन जागृती होणे गरजेची आहे, असे मोलाचे मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून नवरात्र महोत्सवानिमित्त नवरात्र जागर महिला सक्षमीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमात महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन हाती घेतले होते या उपक्रमात महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन शिबीर झुमव्दारे घेण्यात आले.जिल्हातील अनेक महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!