उत्कृष्ट तलाठी म्हणून संजय वानोळे यांचा महसुलीदिनी सत्कार
नांदेड प्रतिनिधी
भोकर तालुक्यातील बोरवाडी गावचे सुपुत्र आणि हदगाव तालुक्यातील घोगरी सज्जा कार्यालयाचे तलाठी संजय आंनदराव वानोळे यांना हदगाव उपविभाग महसूल प्रशासनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महसूल दिनानिमित्त,जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर यांच्या स्वाक्षरीने गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले.
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा गुण गौरव सोहळा नांदेड येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाला.तलाठी संजय वानोळे यांना दि.1 ऑगस्ट 2020 ते 31 जुलै2021 या महसुली वर्षात एक उत्तम प्रशासक व कार्यक्षम शासन प्रतिनिधी म्हणून विविध उद्दिष्टपूर्ती व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे उल्लेखनीय काम केले आहे.त्यांनी केलेल्या या आदर्श व उल्लेखनीय कामगिरी बद्दल वानोळे यांचा भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर होते तर उद्धाटक विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी होते, मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ,जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महसूल प्रशासनकडून गौरविण्यात आल्याबद्दल यांचे विलास मेंडके,नारायण डाखोरे,हनुमान डाके,राजेश्वर झाडे,गंगाधर वानोळे ,बबन भिसे,बबन टारपे,गजानन डोखळे यांनी अभिनंदन केले.