मी झारखंडला कधी गेलोच नाही, भाजपाची बदनामी करण्याचा प्रकार- चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर प्रतिनिधी
26 जुलै
आजवर मी झारखंडला गेलेलो नाही. झारखंडचा इतिहास, भूगोल, राजकारण मला माहित नाही. त्यामुळे मी झारखंड सरकार पडण्याच्या कटात असल्याचा आरोप कपोलकल्पित असल्याचे वक्तव्य भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांचावर झारखंड सरकार पाडण्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वत: पुढे येऊन प्रतिक्रिया दिली आहे.
झारखंडमधील काही आमदारांना आमिष देऊन तिथले झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार पडण्याच्या कामात महाराष्ट्रातील काही भाजपा नेते असल्याचे आरोप झाले होते. त्यासंदर्भात रांची पोलिसांनी एक गुन्हाही नोंदविला असून झारखंड सरकार पाडण्याच्या कटाचे महाराष्ट्र कनेक्शन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे या प्रकरणाशी संबंधित असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावर स्वत: बावनकुळे समोर आले आणि त्यांनी सर्व चर्चा कपोलकल्पित असल्याचे सांगत मी लहान राजकीय कार्यकर्ता असून एका राज्याचे सरकार पडण्याची माझी शक्ती नसल्याचे स्पष्टीकण देत या प्रकरणाशी आपला संबंध नाही, असा दावा त्यांनी केला.
यात मी कधी तिथे गेलो नाही तेथील आमदारांना ओळखत नाही. यामुळे या आरोपात तथ्य नाही. माझी औकात नाही अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. जिथे कधी गेलो नाही, भेटलो नाही तर सरकार पाडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे हे सगळे आरोप खोटे आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करतील असेही ते भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.