नागपूर सीआरपीएफच्या महिला बटालियन द्वारा वृक्षारोपण

नागपूर, 25 जुलै 2021  

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या हिंगणा येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या – सीआरपीएफच्या महिला बटालियनच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांद्वारा इसासानी गावामध्ये 500 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचं संरक्षण ही आपली जबाबदारी समजून तसेच पर्यावरण संरक्षणासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे ‘वृक्षारोपण महाअभियान 2021’ चालविला जात आहे त्याचाच भाग म्हणून हे वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा या वृक्षारोपणा मध्ये सहभाग घेतला. यामध्ये निंब,अर्जुन पिंपळ अशा प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी कमाडंट करुणा राय उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते वृक्षमित्र प्रमाणपत्र  नागरिकांना  वितरित करण्यात आले. द्वितीय कमान अधिकारी कुलदीपसिंग खुराना, उप -कमांडंट बि.एल. शर्मा तसेच सहायक कमांडंट भारतेंद्र सिंह चौहान हे सुद्‌धा उपस्थित होते. 

उपस्थितांना समाजाप्रती एक जबाबदार नागरिक बनविण्यासाठी ‘स्वच्छ भारत हरित भारत’ तसेच ‘सासे हो रही है कम, आओ पेड लगाये हम’ असे संदेश देऊन जागरुकता निर्माण करण्यात आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!