’आईकडे लक्ष द्या’, मित्रांना कॉन्फरन्स कॉल करत तरूणाची आत्महत्या
नागपूर प्रतिनिधी
13 जुलै
नागपुरात एका तरुणांनं आत्महत्येपूर्वी मित्रांना कॉन्फरन्स कॉल करून मोटारसायकलीसह फुटाळा तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. अथर्व राजू आनंदेवार असं 19 वर्षीय आत्महत्या करणार्या तरूणाचं नाव. अथर्व पॉलिटेक्निकचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता.
ही थरारक घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण आनंदेवार कुटूंब आणि परिसर हादरला आहे.
पॉलिटेक्निकचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असलेला अथर्वला एक मोठा भाऊ आहे. तो खासगी कंपनीत काम करतो. वडिल टाईल्स कंपनीत कामाला आहेत तर आई गृहिणी आहे. सोमवारी अथर्व तणावात होता.दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यानं तीन मित्रांना कॉन्फरन्स कॉलला जोडले. आपण आत्महत्या करण्यास जात असल्याचं त्यानं मित्रांना सांगितलं.
मित्रांशी बोलताना,’ मी आत्महत्या करतोय माझ्या आईकडे लक्ष द्या’. अचानाक अथर्वनं असं असं बोलत असल्यानं मित्र हादरले. मित्रांनी त्याला असं नको करू असं सांगत समजवण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि तातडीनं त्याला थांबवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. मात्र अथर्वनं त्याच्या एम. एच. 31, एफएम 10888 क्रमाकांच्या बजाज पल्सर मोटारसायकलसह उडी घेतली.
त्याचे मित्रही तिथं पोहचले मात्र वेळ निघून गेला होता. त्यांनी अथर्वचा शोध सुरु केला मात्र ते त्याला वाचवू शकले नाही. अग्निशमन दल व फुटाळा वस्तीतील जलतरणपटूंच्या मदतीनं त्याची बाईक व त्याचे पार्थिव तलावातून बाहेर काढण्यात आले. अग्निशमनदल तसेच फुटाळा वस्तीतील स्वीमरच्या मदतीने वाहन आणि मृतकाचा शोध घेऊन बाहेर काढण्यात आले.
शवविच्छेदनाकरीता मृतदेह मेडिकलला पाठवण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान अथर्वच्या आत्महत्येचं नेमकं कारण अंधारात आहे. त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अथर्वनं असं टोकाचं पाऊल का उचलंलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.