माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, नरखेड पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व

नागपूर,

भारतीय जनता पक्षाने नागपुरातील नरखेड पंचायत समितीच्या जागा जिंकत आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. ही पंचायत समिती राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाच्या ताब्यात होती. राष्ट्रवादीच्या हातातून नरखेड पंचायत समितीवर भाजपने विजय मिळवल्याने हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यापासून ते गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत. अनिल देशमुख आपल्या मतदारसंघातही नसल्याने या निवडणुकीत काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाच्या ताब्यात असलेली नरखेड पंचायत समिती भाजपने आपल्याकडे खेचून घेतली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!