कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयकडून तपासणी; जेईई मेन्स परीक्षेतील गैरप्रकार कनेक्शन?

नागपूर,

कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयकडून तपासणी करण्यात आली आहे. जेईई मेन्स परिक्षेतील गैरप्रकाराचे कनेक्शन तपासण्यासाठी काही कागदपत्र तपासल्याची माहिती समोर येत आहे. जेईई मेन्स परीक्षेत परीक्षार्थ्यांना निवडक नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी आमिष देऊन काही गैरप्रकार केल्याचं संशय या कोचिंग क्लासेसबद्दल आहे… आजमशाह चैक, नंदनवन परिसरातील क्लासेसची तपासणी करण्यात आली आहे.

नागपुरात सोमवारी सीबीआयने दोन कोचिंग क्लासेसवर तपासणी मोहिम राबिवल्याची माहिती मिळत आहे. जेईई मेन परीक्षेतील अनियनिततेच्या पार्शसभूमिवर दोन क्लासेसमध्ये सीबीआयने धडक दिली आहे. यापुर्वी सीबीआयने पुणे, दिल्ली, जमशेदपूर आणि अन्य ठिकाणी धाड टाकली.

गेल्या 24 तासांत कोचिंग क्लासेसमध्ये स्थानिक युनिटच्या मदतीने सीबीआय दिल्लीच्या पथकाने मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!