अनिल परबांना दे धक्का, परिवहन विभागातील खास अधिकार्याच्या घरावर छापा
नागपूर,
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे परब यांच्या संबंधितीत नागपूरमध्ये ईडीने छापा टाकला आहे. वादग-स्त अधिकारी असलेले बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयावर आणि ऑफिसवर छापा टाकण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या प्रकरणाशी संबंधीत नागपूरमध्ये ईडीने छापासत्र सुरू केले आहे. नागपूर ग-ामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयात व घरी ईडीने कारवाई केली आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांच्या जवळचे अधिकारी समजले जातात.
परंतु, दुसरीकडे, परीवहन मंत्री यांच्या संबधीत कोणत्याही ठिकाणांर ए च्या धाडी पडलेल्या नाहीत. अनिल परब यांच्या संबंधित कोणत्याही ठिकाणार ए च्या धाडी पडलेल्या नाही आहेत’ असं परब यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अनिल परब यांना रविवारी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेनं त्याच्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतले होते. परब यांनी बीएमसी ठेकेदारांची माहिती दिली होती. याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे आज यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीकडून गवळी यांच्या संस्थेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकल्या. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्याचं समजतंय. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीनं या धाडी टाकल्याचं समोर येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग-ो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीनं धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे.