प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्याध्यक्षपदी रमेश श्रीखंडे यांची नियुक्ती
मुंबई प्रतिनिधी
30 जुलै
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्याध्यक्षपदी धुळ्याच्या रमेश श्रीखंडे यांची नियुक्ती केली आहे. टिळक भवन येथे श्रीखंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, भा. ई. नगराळे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रा. प्रकाश सोनवणे, रामकिशन ओझा, धनंजय राठोड आदी उपस्थित होते.
रमेश श्रीखंडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 1970 पासून ते पक्षात कार्यरत आहेत. पक्षातील विविध पदावर त्यांनी काम केले आहे. धुळे महानगरपालिकाचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे. प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्याध्यक्षपदी एका ज्येष्ठ कार्यकर्त्याची नियुक्ती करुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यथोचित सन्मान केल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.