जुहू परिसरात 4 मजली इमारत कोसळली; 6 जणं जखमी
मुंबई प्रतिनिधी
28 जुलै
मुंबईमध्ये मध्यरात्री अंधेरीच्या परिसरात 4 मजली कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. जुहू गल्ली परिसरात बांधकाम सुरु असलेली हे घर कोसळलं आहे. ही चार मजल्याचं घर समोरच्या 3 घरांवर कोसळलं आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये काही जणं जखमी झाले आहेत.
अंधेरी पश्चिमेत जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 13 असं 4 मजल्याचं बांधकाम सुरू असताना ते समोरच्या 3 घरांवर कोसळलं आहे. या घरांच्या ढिगार्याखाली काही लोकं अडकले होते. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाचा जवानांनी घटनास्थळावर धाव घेत चार तासांमध्ये अडकलेल्यांना रेस्क्यू केलं आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये 6 जणं जखमी झाले आहेत. यामध्ये एक अग्निशमन दलाचा अधिकारी आहे. या अधिकार्याला उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आलंय. तर उर्वरित 5 जणांना मुंबईतील कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांना एसआयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या 5 जखमींमध्ये 4 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सध्या या सर्व घरांचा ढिगारा मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगर पालिकेच्या जवान काढण्याचा प्रयत्न करत आहेत,. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन प्लस तीन असे चार मजल्यांची अनधिकृत घरं असल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये भीती पसरली आहे.